आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistani Captain Sarfaraz Ahmed Yawns During Match, Pakistani Fans Gets Angry On Loosing With India

सरफराजला घरी पाठवा, भारताकडून पराभव झाल्यानंतर संतप्त पाकिस्तानी फॅन्सच्या प्रतिक्रीया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅन्चेस्टर- भारताकडून पराभव मिळाल्यानंतर पाकिस्तानी फॅन्शमध्ये खूप नाराजी आहे. एकीकडे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाज चांगले प्रदर्शन करू शकले नाही, तर दुसरीकडे फलंदाजही फ्लॉप ठरले आहेत. पहिली विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा संघ पत्याच्या किल्याप्रमाणे ढासाळला. पाकिस्तानचा कर्णदार सरफराजदेखील काही खास करू शकला नाही. भारतीय संघापुढे कर्णधार म्हणून तो सपशेल फेल ठरला. त्यामुळेच आता पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स त्यची खूप निंदा करत आहेत. पाकिस्तानमध्ये ट्विटरवर "#सरफराज_को_वापस_बुलाओ" ट्रेंडिंगवर आहे. भारताकडून पराभव मिळाल्यानंतर पाकिस्तानी फॅन्स खूप नाराज आहेत आणि सरफराजला संघातून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.

 

 

एका यूझरने लिहीले- 'सरफराज टीममध्ये का आहे? कीपर म्हणून त्याने 3 कॅच आणि स्टम्पिंग सोडली, फलंदाज म्हणून गोलंदाजांचा सामना करू शकला नाही आणि कर्णधार म्हणून त्याला माहितच नाही की, फिल्डींग कशी लावली जाते. #सरफराजला_परत_बोलवा.' ट्विटरवर सरफराजचे जांभली देतानाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तो फोटो शेअर करत फॅन्स त्याची खूप निंदा करत आहेत. एका युझरने माजी कर्णधार इम्रान खानचा फोटो सरफराजच्या फोटोसोबत शेअर केला आणि त्यांच्यात बरोबरी केली.

 

 

 

 

मॅचनंतर पाकिस्तानमध्ये ट्विटरवर Sheesha टॉप ट्रेंड करत आहे. खर तर भारतासोबतच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडू शीशा बारमध्ये दिसले होते. शीशा पीत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओत शोएब मलिक आणि इथर खेळाडू दिसत आहेत.