आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे इंग्लंडमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर खेळत होता मॅच, तिकडे कँसरने घेतले मुलीचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडविरूद्ध वन-डे सीरिज खेळत असलेला पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आसिफ अलीच्या कँसर पीडित मुलीचे अमेरिकेत उपचार सुरू होते. अलीच्या मुलीला स्टेफ-5 कँसर होता. पाकिस्तान सुपर लीगमधली अलीची टीम इस्लामाबाद यूनाइटेडने अधिकृतरीत्या या घटनेची माहिती दिली.


इस्लामाबाद यूनाइटेडने रविवारी रात्री ट्वीट करून शोक व्यक्त करत लिहीले की, आसिफ साहस आणि हिमतीचे चांगले उदाहरण आहे. त्याने आम्हाला प्रेरणा दिली आहे. आसिफ अली पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये इस्लामाबाद यूनाइटेडच्या टीमकडून खेळतो.

 

30 मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम टीममध्ये सलेक्शन न झालेला आसिफ अली आपला दौरा सोडून परत पाकिस्तानला येणार आहे. 27 वर्षीय आसिफ रविवारी हेडिंग्लेमध्ये इंग्लँडविरूद्ध सीरिजच्या पाचव्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये 22 रनावर आउट झाले. पाकिस्तानने सीरिज 0-4 ने जिंकली.

 

मध्यफळीचा फलंदाज आसिफने आतापर्यंत 16 वन-डे मॅचमध्ये 31.09 सरासरीने 342 रन बनवले आहेत. इंग्लंडविरूद्धच्या सीरिजमध्ये आसिफने चार मॅचमध्ये दोन अर्धशकतकाच्या मदतीने 142 रन काढले आहेत.