आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद आफ्रिदी म्हणाला-पाकिस्तानचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत आणि चालले काश्मीर मागायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीने काश्मीरबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. पण त्याचे हे वक्तव्य पाकिस्तानमधील लोकांना फारसे आवडेल असे वाटत नाही. कारण शाहीद आफ्रिदीने या वक्तव्याच्या माध्यमातून पाकिस्तानलाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानला आपले चार प्रांत धड सांभाळता येत नाही आणि काश्मिर काय घेणार असे आफ्रिदी म्हणाला आहे. काश्मीर सांभाळणे पाकिस्तानला झेपणार नसल्याचे आफ्रिदीने या वक्तव्यातून दर्शवले आहे. 


काश्मीरचे लोक मरताना पाहून वेदना होतात 
- आफ्रिदी म्हणाला - काश्मीर भारताला द्यायचीही गरज नाही. काश्मीरला स्वतंत्र देश बनवायला हवा. त्यामुळे तेथे मानवता टिकून राहील. काश्मीरच्या लोकांना मरताना पाहून फार वेदना होतात. 
- आफ्रिदी म्हणाला, कश्मीर आणि इतर भारतात पसरलेल्या दहशतवादासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले जाते. जागतिक समुदायाकडूनही वारंवार पाकिस्तानवर टीका केली जाते. 
- काश्मीरच्या मुद्द्यावर आफ्रिदीने एप्रिलमध्येही ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीर स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्याठिकाणी स्वातंत्र्याच्या नावाखाली निर्दोषांना मारले जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्था हा रक्तपात थांबवण्यासाठी पावले का उचलत नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. 

 

बातम्या आणखी आहेत...