Home | Sports | From The Field | pakistani cricketer shahid afridi thinking retirement on one day cricket

आफ्रिदीची वन-डे मधून निवृत्तीची शक्यता!

Agency | Update - May 23, 2011, 01:24 PM IST

गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तान संघात निर्माण झालेल्या अंतर्गत वादावर अखेर शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरच पडदा पडणार आहे.

  • pakistani cricketer shahid afridi thinking retirement on one day cricket

    कराची - गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तान संघात निर्माण झालेल्या अंतर्गत वादावर अखेर शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरच पडदा पडणार आहे.

    चांगली कामगिरी करून संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कर्णधार शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव आणि वेस्ट इंडीज दौऱ्यातील नाचक्कीपणामुळे उचलबांगडी झालेला आफ्रिदी अखेर निवृत्तीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

    पाकिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शाहिद आफ्रिदीने ३१४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाकडून खेळणाऱ्या आफ्रिदीने २ ऑक्टोबर १९९६ मध्ये केनियाविरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीला सुरुवात केली. सहा हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या आफ्रिदीने ६ शतके व २२ अर्धशतकांची खेळी केली आहे. यामध्ये ६६ चौकार व २८८ षटकार ठोकले आहेत.

    अंतर्गत वादामुळेच आफ्रिदीच्या कर्णधारपदाची जबाबदारी अडचणीत आली. दरम्यान, विश्वचषक आणि वेस्ट इंडीज दौऱ्यातील पराभावामुळेच आफ्रिदीचे कर्णधारपद धोक्यात आले. हे दोन पराभव वर्मी लागलेल्या पीसीबीने तत्काळ आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या नेतृत्वाची जबाबदारी मिसबाहकडे सोपवली.Trending