आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Hindu Refugee Woman Named Her Daughter 'citizenship' After Citizenship Amendment Bill Passed In Parliament

नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेत मंजूर झाल्याचा आनंद; शरणार्थी महिलेने मुलीचे 'नागरिकता' असे केले नामकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीच्या आजीने विधेयक मंजूर व्हावे यासाठी केली होती प्रार्थना, दिवसभर उपवास देखील केला
  • विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीतील 750 पाकिस्तानी हिंदू शरणार्थिंनी केला जल्लोष

नवी दिल्ली - नागरिकत्व संशोधन विधेयकाला बुधवारी संसदेतून मंजूरी मिळाल्यानंतर दिल्लीतील मजनूचा टीला येथे राहणाऱ्या 750 पाकिस्तानी हिंदू शरणार्थिंनी एकच जल्लोष केला. विधेयक मंजूर होण्याच्या आनंदात येथील रहिवासी पाकिस्तानी हिंदू शरणार्थी महिलेने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीचे 'नागरिकता' नाव ठेवले. नागरिकत्व संशोधन विधेयक सोमवारी लोकसभेत आणि बुधवारी राज्यसभेत मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजूरीनंतर हा कायदा तयार होईल. 
मुलीची आजी मीरा दास यांनी सांगितले की, सोमवारी मुलीचा जन्म झाला आणि कुटुंबियांनी तिचे 'नागरिकता' असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. मीरा यांनी देखील लोकसभेत विधेयक मंजूर होण्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्या दिवशी उपवास ठेवला होता. मीरा यांनी सांगितले की, "नागरिकत्व संशोधन विधेयक 2019 संसदेत मंजूर व्हावे अशी माझी तीव्र इच्छा होती." 
मुलीची आई आरती म्हणाली की, आम्ही सात वर्षांपासून नागरिकत्वासाठी झगडत आहोत. माझ्या मुलीच्या जन्मानंतर आमचे स्वप्न पूर्ण झाले. आता आम्हालाही या देशाचे नागरिक म्हटले जाईल. आम्ही याबाबत आनंदी आहोत.