Home | National | Other State | Pakistani Intruder Beaten Indian Farmer On Zero Line In Pathankot Of Punjab

PAK बॉर्डरवर चारा कापत होता शेतकरी, पाठीमागून आलेल्या व्यक्तीने केली मारहाण; शेतकरी म्हणाला - मला जबरदस्तीने पाकिस्तानात घेऊन जात होता तो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 04:58 PM IST

आरडाओरडा ऐकून इतर शेतकरी घटनास्थळी दाखल, तोपर्यंत आरोपीने पाकिस्तानच्या दिशेने काढला पळ

 • Pakistani Intruder Beaten Indian Farmer On Zero Line In Pathankot Of Punjab

  पठानकोट (पंजाब) - पंजाबमधील पठाणकोटच्या बमियाल भागातील खुदाईपूर गावात झिरो लाइनवर भारतीय हद्दीत घुसून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. तेवढ्यात आरोपीने भारताच्या हद्दीत घुसला आणि त्याने शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत नेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने केलेल्या आरडाओरड्यामुळे आसपासच्या शेतात काम करत असलेले लोक त्यास वाचविण्यासाठी आले. पण तोपर्यंत आरोपी पाकिस्तानच्या दिशेने फरार झाला.

  असे आहे पूर्ण प्रकरण...

  शेतकरी सुखबीर सिंह लक्खाने बमियाल पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. सुखबीरने सांगितले की, तो सकाळच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सिमेवरील गेट नंबर 9 च्या तारेपलिकडील आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेला होता. अंदाजे 10.30 वाजता चारा कापत असताना पाठीमागून एक व्यक्ती आला आणि त्याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने जबरदस्तीने पाकिस्तानच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

  सुखबीरने सांगितले की, आरोपीने त्याला 2-3 मिनिटे मारहाण केली आणि स्वरक्षणार्थ त्याने देखील आरोपीला मारहाण केली. यादरम्याने सुखबीरची नजर पाकिस्तान सीमेवर उभे सिविल ड्रेसमध्ये असलेल्या तीन लोकांवर गेली. त्यातील एकाच्या हातात रायफल होती. मारहाणीचा गोंधळ ऐकून आसपासच्या शेतात काम करत असलेले इतर काही शेतकरी घटनास्थळी दाखल झाले असता आरोपीने सुखबीरला धक्का देत पाकिस्तानच्या दिशेने पळ काढला.

  सुखबीर ने सांगितले की, पाकिस्तान सीमेवर उभे असलेले आरोपीचे तीन साथीदार आणि आरोपी लष्करी स्थळाकडे निघून गेले. सुखबीर चारा कापत असलेल्या ठिकाणाहून पाकिस्तानची सीमा फक्त 500 मीटरच्या अंतरावर होती. या शेतकऱ्यांचे शेतं जलालिया नाल्याच्या पार भारतीय हद्दीत आहेत.


  ग्रामस्थांनी केली पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
  संबंधित हरकत पाकिस्तानी लष्काराने केली असल्याची सुखबीरने शंका व्यक्त केली आहे. त्याने सांगितले की, या भागातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. गावचे सरपंच रणजीत सिंहने सांगितले की, गावातील शेतकरी सीमेजवळील वाहत्या नाल्याजवळ शेतात जातेवेळी सुरक्षा दलाचे जवान त्यांच्यासोबत नसतात. यामुळे ही घटना घडली आहे. एएसआय तरसेम लाल यांनी सांगितले की, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर आम्ही घटनास्थळी गेलो होतो. सध्या तपास सुरु असून तपासानंतर हे प्रकरण बीएसएफकडे सोपविण्यात येणार आहे.

Trending