आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफांना वाटले भारतात येण्याचे आले निमंत्रण, परंतु फोनवर ऐकावे लागले वाजपेयींचे खडे बोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योच गुरुवारी मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयी हे 11 जूनपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. अटल बिहारी वाजपेयी भारताच्या अशा नेत्यांमधील एक होते, ज्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. एका पुस्तकामधील माहितीनुसार, अटल बिहारी वाजपेयी यांनी नवाज शरीफ याना फोनवर चांगलेच झापले होते. 


पाकिस्तानी पत्रकार नसीम जेहरा यांचे पुस्तक 'फ्रॉम कारगिल टू द कॉप: इवेंट्स दॅट शॉक पाकिस्तान' मध्ये कारगिल युद्धाशी संबंधित विविध छोट्या-छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुस्तकातील माहितीनुसार तत्कालीन पाक पीएम नवाज शरीफ यांना कारगिल युद्धाविषयी मुशरर्फ अर्धवट माहिती देत होते. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींविषयी लिहिण्यात आले आहे की, कारगिल युद्ध दरम्यान अटलजींनी नवाज यांना भारतात येण्याचे निमंत्रण देईल होते, परंतु नंतर फोनवर खडे बोल सुनावून भारतात नाही आले तरी चालेले असे सांगितले होते.


नवाज यांना आधीपासून नव्हती युद्धाची माहिती :
जेहरा यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, कारगिलमध्ये पाकिस्तानच्या या ऑपरेशन विषयी नवाज शरीफ यांना जास्त माहिती नव्हती. हे संपूर्ण ऑपरेशन मुशर्रफ यांच्या निगराणीखाली चालू होते. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आर्मीने युद्धाची तयारी सुरु केल्याच्या पाच महिन्यानंतर नवाज यांना ही बातमी समजली. त्यांना 17 मे 1999 मध्ये या विषयी सांगण्यात आले परंतु त्यावेळीही संपूर्ण माहिती देण्यात आली नाही. नवाज यांना हेही माहिती नव्हते की पाकिस्तानी सैन्याने एलओसी क्रॉस केली आहे. नवाज यांना एवढेच सांगण्यात आले होते की, काश्मीर मुक्तीचे युद्ध अपग्रेड करण्यात येत आहे.


बॅकचॅनल डीलची सुरुवात : 
पुस्तकामध्ये, कारगिल संदर्भात झालेल्या बॅकचॅनल डीलविषयी सांगण्यात आले आहे. पुस्तकानुसार, जून 1999 मध्ये भारताचे बॅकचॅनल दूत आर के मिश्रा पाकिस्तान दौरा करून भारतात आले होते. त्यानंतर पाकिस्तानचे बॅकचॅनल दूर नियाज नाइक यांनी जूनच्या शेवटी दिल्लीचा दौरा केला. या दरम्यान एका कराराला अंतिम रूप देण्यात आले होते. या करारानुसार, दोन्ही पक्ष, 1972 मध्ये झालेल्या शिमला करारानुसार एलओसीचा सन्मान करतील. दोन्ही देशाचे मिल्ट्री अधिकारी काही खास कामासाठी भेटतील, ज्यामध्ये दोन्ही नेता लाहोर घोषणापत्रचा सन्मान करतील आणि काश्मीर सारख्या गंभीर मुद्यावर एका निश्चित वेळेत तोडगा काढतील. असा निरोप नाइक यांच्याकडून नवाज यांना मिळाल्यानंतर, नवाज यांना आपल्या बीजिंग दौऱ्यामध्ये दिल्लीला थांबण्याची प्लॅनिंग केली होती. पुस्तकानुसार, त्यावेळी असे समजे जात होते की, नवी दिल्लीमध्ये वाजपेयी आणि नवाज एका खास करारावर स्वाक्षरी करणार आहेत.


नवाज यांना फोनवर मिळाला होता झटका : नवाज शरीफ यांनी दौऱ्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांचे प्लेन आणि गुडविल मॅसेज दोन्हीही तयार होते. त्यांनी हा गुडविल मॅसेज रात्री फॅक्स करून भारतात पाठवला होता आणि वाजपेयींच्या उत्तराची वाट पाहत होते. पुस्तकात जेहरा यांनी सांगितले की, रात्री जवळपास 10 वाजता वाजपेयींचा संदेश एखाद्या तोफेच्या गोळ्याप्रमाणे होता. त्यांनी संदेशात लिहिले होते की, नवाज यांना भारतामध्ये बोलावण्यात येत नाहीये, उलट कारगिलमधून पाकिस्तान सैन्य माघारी बोलावण्याची मागणी करत आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होऊ शकते. परंतु फॅक्स करण्यापूर्वी वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांना फोन केला. वाजपेयींचा फोन येताच शरीफ म्हणाले की, आम्ही खूप खुश आहोत, ही चांगली बातमी आहे. यावर वाजपेयी म्हणाले की, "तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, मी तुम्हाला कधीही असे म्हणालो नाही की, मी तुम्हाला भारतात येण्याचे निमंत्रण देत आहे. तुम्ही या, परंतु मी तुम्हाला आमंत्रित करणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...