आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया-इंग्लंड सामन्यापूर्वी पाकिस्तानी व्यक्तीने म्हटले 'जन गण मन...', व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भलेही सीमेने दोन देशांच्या लोकांना वेगळे केले आहे, पण कुठे ना कुठे माणुसकी, प्रेम आणि आदरयुक्त नात्याने सगळ्यांना जवळ ठेवले आहे. असेच एक नाते भारत आणि पाकिस्तानचेही आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवरून वाद असतील, पण खेळाच्या मैदानात दोन्ही देश एतजुटीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना पाठिंबा देतात.

 

मागच्या महिन्यात एशियन गेम्सदरम्यान नीरज चोप्रा पाकिस्तानच्या अरशद नदीमसोबत हस्तांदोलन करताना दिसले होते. तर दुसऱ्या बाजुला इंडिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान युजवेन्द्र चहलने पाकिस्तानच्या उस्मान खानच्या बुटाची लेस बांधून आपुलकीचे उदाहरण दिले आहे.

 

 

त्यातच आता पाकिस्तनाच्या एका समर्थकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्या गळ्यात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहेत. व्हिहिओत तो भारताचे राष्ट्रगीत "जन...गन...मन.." म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहीले आहेत.