आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Officer Who Killed More Than 400 People In Fake Encounter Blacklists In America

फेक एनकाउंटरमध्ये 400 पेक्षा जास्त लोकांना मारणार्या पाकिस्तानी अधिकाऱ्यावर अमेरीकेने घातली बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानातील माजी पोलिस अधिकारी राव अनवर 190 पेक्षा जास्त पोलिस एनकाउंटरमध्ये सामील होते

वॉशिंग्टन- अमेरिकेने कराचीचे माजी वरिष्ठ पोलिस अधिक्षक राव अनवरसा ब्लॅकलिस्ट केले आहे. त्यांच्यावर आपल्या कार्यकाळात गंभीररित्या मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अनवरने आपल्या कार्यकाळात 190 पेक्षा जास्त एनकाउंटरमध्ये 400 पेक्षा अधिक निष्पापांना मारले आहे. यात कराचीमधील लोकही सामील आहेत. अनवर सहा देशातील त्या 18 लोकांमध्ये सामील आहेत, ज्यांच्यावर अमेरिकेतील ट्रेजरी विभागाने आर्थिक बंदी लावली आहे. अमेरिकेने मंगळवारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने ही माहिती दिली.

निष्पापांविरोधातील आत्याचार सहन केला जाणार नाही- अमेरीका

ट्रेजरी विभागाचे सचिव स्टीवन टी न्यूकिनने सांगितले की, अनवरने आरोपी आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले, जे बळजबरीने वसूली, जमीनवर कब्जा, अमली पदार्थांची तस्करी आणि खूनासारख्या आरोपांमध्ये सामील होते. अनवरला गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यूकिनने पुढे सांगितले की, अमेरिका निष्पाप नागरिकांवर झालेल्या आत्याचार, अपहरण, लैंगिक हिंसा, हत्या असा क्रूर गुन्ह्यांना थारा देत नाही.

बातम्या आणखी आहेत...