Home | International | Pakistan | pakistani opposition parties to challenge imran khan with own pm candidate in parliament

Pak: इम्रान खान यांच्या बहुमत चाचणीच्या दिवशी मिळून उमेदवार देणार नवाज, बिलावल यांचे पक्ष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 03, 2018, 04:49 PM IST

PM पदाची शपथ घेऊ पाहणारे इम्रान खान यांच्या मार्गात पीएमएल-एन आणि पीपीपीने एकत्रित येऊन मोठा अडथळा आणण्याची तयारी केली.

 • pakistani opposition parties to challenge imran khan with own pm candidate in parliament

  इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेऊ पाहणारे इम्रान खान यांच्या मार्गात पीएमएल-एन आणि पीपीपीने एकत्रित येऊन मोठा अडथळा आणण्याची तयारी केली आहे. या दोन्ही पक्षांनी संयुक्त आघाडी स्थापित आपला एक उमेदवार इम्रान यांच्या विरोधात उभा करणार आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडे सध्या 116 जागा आहेत. तरीही त्यांना बहुमत मिळवण्यासाठी आणखी 21 खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळेच, बहुमत चाचणीच्या दिवशी शरीफ आणि बिलावल यांचे पक्ष इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन नवीन आघाडी करत सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. यापूर्वी पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षांनी फक्त मजबूत विरोधी पक्ष म्हणून एकत्रित येत असल्याचे म्हटले होते.

  137 खासदार असल्याचा इम्रान यांचा दावा
  माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा मिळवला असा दावा केला. मुत्तहिदा कौमी मूवमेंट-पाकिस्तान, द ग्रॅन्ड डेमोक्रेटिक अलायंस, पीएमएल-कैद आणि बलूचिस्तान अवामी पार्टी हे 4 पक्ष पीटीआयला समर्थन देणार असे सांगितले जात आहे. सोबतच इतर अपक्ष खासदारांचा पाठिंबा घेऊन एकूण 137 खासदारांचे संख्याबळ मिळवले आहेत असे इम्रान यांनी सांगितले आहे.

  असे बहुमत मिळवणार इम्रान खान?

  पार्टी सीटें
  पीटीआय 116
  मुत्तहिदा कौमी मूवमेंट पाकिस्तान 06
  पाकिस्तान मुस्लिम लीग-कैद 04
  बलुचिस्तान अवामी पार्टी 04
  ग्रॅन्ड डेमोक्रेटिक अलायंस 02
  अपक्ष 05
  एकूण 137
  बहुमतासाठी आवश्यक जागा 137

Trending