आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात छोट्या गुहेसारख्या घरात राहत आहेत लोक, मातीने सारवलेल्या अाहेत भिंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात महागाई आणि गर्मीमुळे लोक गुहेसारख्या घरांचा वापर करत आहे.  ही घरे भुकंपरोधक आहेत. तसेच या घरांना तयार करायलाही फार खर्बच येत नाही. ही घरे इस्लामाबादच्या उत्तर-पश्चिमेला 60 किलोमीटरवर हसन अब्दल गावत पाहायला मिळतात. या गावातील अंदाजे 3000 लोक अशा घरांत राहतात. ही घरे अतिशय थंड असतात. त्यामुळे अशी घरे बांधण्याकडे लोकांचा ओढा आहे. 

 

घराच्या भिंती मातीच्या
या गुहांसाठी हाताने खोदकाम केले जाते. तर भिंतीवर प्लास्टर करण्यासाठी मातीचा वापर होतो. हा परिसर मुघलांनी वसवलेला आहे त्यामुळे पाचव्या शतकापासून येथील लोक अशाच घरात राहतात. 40 डिग्री तापमानातही ही घरे थंड राहतात आणि थंडीच्या ऋतुत गरम राहतात. तसेच नवीन घर बांधायला लागणारा खर्च या घरांच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे या प्रकारच्या घरांची संख्या वाढत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...