आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी सिंगर फरहानचा सलीम मर्चंटवर आरोप - 'माझे गाणे 'रोईयां' ची धून चोरून 'हीरया' गाणे बनवले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिंगर-म्यूझिशियनची जोडी सलीम-सुलेमान यांचे नवे गाणे 'हीरया' देखील पाकिस्तानी सिंगर्सच्या निशाण्यावर आले आहे. पाकिस्तानचा सिंगर फरहान सईदने ट्वीट करून लिहिले, 'चोरी करायची आहे तर विचारून करा आणि जर विचारायचेही नाहीये तर कमीत कमी चांगले तरी करा.'  

सईद म्हणाला ही आहे 'रोईयां' ची कॉपी... 
पाकिस्तानचा सिंगर आणि अभिनेता सईदने लिहिले आहे - 'हे आत्ताच कुणीतरी मला पाठवले आहे. सलीम मर्चंटचे हे गाणे माझे गाणे 'रोईयां' ची पूर्ण कॉपी आहे. मला आश्चर्य वाटते की, ते कुणाचेतरी काम चोरतात आणि तरीदेखील ते स्वतःला कलाकार म्हणण्याची हिंमत करतात. चोरी करायची आहे तर विचारून करा आणि जर विचारायचेही नाहीये तर कमीत कमी चांगले तरी करा. चोरी थांबवा.' 

सलीमने दिले उत्तर... 
सिंगर सलीम मर्चंटने सईदला ट्विटरवरच उत्तर दिले आहे. सलीमने दोन ट्वीट केले आहेत, ज्यामध्ये लिहिले आहे, "फरहान मी आता तुझे गाणे ऐकले. हा केवळ एक योगायोग आहे की, 'हीरया' चा कोरस तुझ्या गाण्याप्रमाणे आहे. खरे सांगायचे तर मी हे याआधी कधीच ऐकले नाही. अनेकदा असे होते जेव्हा नोट्स सारखे असतात. सुलेमान आणि माझ्या नावे कधीही चोरी करून गाणे बनवण्याचा रेकॉर्ड नाहीये.'  

लिरिसिस्टदेखील सेम असल्याचे तो म्हणाला... 
फरहान सईदने ट्वीटवर रिप्लाय करत लिहिले, 'सलीम तू म्हणत असशील तर ठीक आहे, पण आणखी एक योगायोग हा आहे की, आपले गीतकारदेखी सारखे आहेत. तरीदेखील शुभेच्छा. यावर सलीमने पुन्हा लिहिले, 'तू त्यांनाच का नाही विचारात, जर मला कॉपी करायची असती, तर मी माझ्या करिअरमध्ये खूप आधीच ते केले असते. मला वास्तवात वाटते की, तुझे गाणे मी यापूर्वी ऐकले अस्तर, तर त्या गाण्यात आम्ही बदल केला असता. तरीही आशा आहे की, तू समजून घेशील.' 

'प्राडा' गाण्यावरदेखील केला होता आरोप... 
'प्राडा' गाण्याबद्दलही पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने बॉलिवूडवर गाणे चोरल्याचा आरोप केला होता. मेहविशने लिहिले होते, 'मला हे खूप विचित्र वाटते की, एकीकडे बॉलिवूड पाकिस्तानला नेहमीच शिव्या देत असते आणि दुसरीकडे आमचे गाणे कुणाच्याही परवानगीविना चोरतात. कॉपीराइट उल्लंघन आणि रॉयल्टी पेमेंट्स याच्याशी त्यांना काहीच घेणे देणे नाहीये.' 'प्राडा' हे गाणे पाकिस्तानच्या 'गोरे रंग का जमाना' या गाण्याशी मिळते जुळते असल्याचे सांगितले गेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...