आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड व्हिडिओ लीक झाल्याने चर्चेत आली पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा, पीएम मोदींना दिली होती जीवे मारण्याची धमकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रबीची न्यूड छायाचित्रे आणि व्हिडिओ ऑनलाइन लीक झाली आहेत. विशेष म्हणजे नेटकरी तिच्या पाठिशी उभे दिसत आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या या फोटो व व्हिडिओंना व्हायरल न करण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांच्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडिओ लीक झाल्याची शंका काही नेटकरी उपस्थित करत आहेत. 

पीएम मोदींना दिली होती जीवे मारण्याची धमकी
रबीने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सरकारकडून घालण्यात आलेल्या संचारबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तिने अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करून, ‘मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी’, असे वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते.