आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देणा-या पाकिस्तानी गायिकने इंडस्ट्रीला ठोकला रामराम, हे ठरले कारण   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  अंगावर बॉम्ब जॅकेट घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारी पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा हिने शोबीज इंडस्ट्रीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.  सोडण्याचे जाहिर केले आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित रबीने हा निर्णय सांगितला. 

”मी, रबी पिरजादा इंडस्ट्री सोडत आहे. अल्लाह माझ्या पापांना माफी देवो आणि लोकांचा माझ्याप्रती असलेला दृष्टीकोन बदलो अशी मी आशा करते”, हे ट्विट करत रबीने तिचा प्रोफाइल फोटो काळ्या बँकग्राऊंडने बदलला.

न्यूड व्हिडिओ झाला होता लीक... 
काही दिवसांपूर्वीच रबीचा न्यूड व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर लीक झाली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती.  
 

पीएम मोदींना दिली होती धमकी... 
रबीने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सरकारकडून घालण्यात आलेल्या संचारबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तिने अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करून, ‘मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी’, असे वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते.