आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने जवानाचे अपहरण केले, ९ तास यातना दिल्या; गळा, पाय कापले, डोळे काढले, शॉक देऊन गोळीही झाडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्य छायाचित्रे याहून बीभत्स आहेत. भारतीय जवानास कसे क्रूरपणे मारले हे कळावे म्हणून हे एक छायाचित्र देत आहोत - Divya Marathi
अन्य छायाचित्रे याहून बीभत्स आहेत. भारतीय जवानास कसे क्रूरपणे मारले हे कळावे म्हणून हे एक छायाचित्र देत आहोत

-  हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह मंगळवारी शहीद झाले होते

- भारत-पाकिस्तान सीमा, ताबा रेषेवर हाय अलर्ट

 

जम्मू- सांबा जिल्ह्यात रामगड सेक्टरमध्ये मंगळवारी शहीद झालेले बीएसएफचे जवान नरेंद्र सिंह (५१) यांचा मृतदेह ९ तासांनी अत्यंत वाईट स्थितीत सापडला. त्यांचा गळा दाबण्यात आला, एक पाय तुटलेला व डोळे फोडलेले आहेत. पाठीवर विजेच्या धक्क्याने जळाल्याच्या खुणा आहेत. शरीरावर तीन गोळ्या लागल्या आहेत. बीएसएफने मृतदेह रुग्णालयात न पाठवता बुधवारी गुपचूप पोस्टमाॅर्टेम करून नातेवाइकांकडे सोपवला.  यावर कुणीच बोलण्यास तयार नाही. पाक सीमेवर शहिदाच्या क्रूर विटंबनेचा हा पहिलाच प्रकार आहे. यानंतर १९२ किमी भारत-पाक सीमा व ७४० किमी ताबा रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


जवानाला शोधण्यासाठी पाकला मदत मागितली तर पाणी साचल्याचा बहाणा
मंगळवारी सकाळी पाकच्या गोळीबारानंतर नरेंद्र सिंह बेपत्ता झाले. अधिकाऱ्यांनुसार, पाकच्या बॅट टीमने जखमी नरेंद्र यांचे अपहरण केले.  बीएसएफने हॉटलाइनवर रेंजर्सशी संपर्क साधला. बेपत्ता जवानाला शोधण्यासाठी संयुक्त गस्तीचा आग्रह केला. पण पाक रेंजर्सनी बॉर्डरवर पाणी साचल्याचा बहाणा केला. दिल्ली ते इस्लामाबादपर्यंत दबाव वाढवल्यानंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह बॉर्डरवर मिळाला. फ्लॅग मीटिंगनंतर मृतदेह मिळाल्याची चर्चा आहे. परिसरात मृतदेह सापडला असल्याचे बीएसएफनेही या वेळी म्हटले आहे. 


शहिदाचा मुलगा म्हणतो, माझे वडील शहीद कसे झाले, सरकारने सांगावे
बुधवारी वडील शहीद झाल्याचे कळले. त्यांच्यासोबत काय झाले हे सरकारने सांगावे. कुठलाही अधिकारी काहीच सांगत नाही. सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये गेलो, पण तेथेही कळले नाही. 
- मोहित, शहीद नरेंद्र यांचा मुलगा


केंद्रीय मंत्री राव म्हणाले, हे नवीन नाही, पाकने पूर्वीही असे केले आहे
पाकसाठी क्रौर्य काही नवीन नाही. थेट युद्धात पाक भारताला हरवू शकला नाही. जवानांना मारून आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न हे पाकिस्तानचे धोरण आहे. 
- राव इंद्रजित सिंह, केंद्रीय मंत्री.

बातम्या आणखी आहेत...