आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani User Asked Adnan Sami 'Where Was Your Father Born? Singer's Quick Answer

पाकिस्तानी यूजरने अदनान सामीला विचारले - 'तुझे वडील कुठे जन्मले ? सिंगरने दिले सडेतोड उत्तर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिंगर अदनान सामी याला एका पाकिस्तानी व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या जन्मस्थळाबद्दल विचारले. ज्याचे कडक उत्तर देत त्याने उजरची बोलती बंद केली. ट्रोलरने गुरुवारी ट्विटरमध्ये अदनानला विचारले होते, 'तुझे वडील कुठे जन्मले होते आणि कुठे त्यांचे निधन झाले ?' अदनानने ट्रोलरला उत्तरदेत लिहिले, 'माझे पिता 1942 मध्ये भारतात जन्मले आणि 2009 मध्ये भारतातच कालवश झाले. पुढे आणखी काही जाणून घ्यायचे आहे ?'
 

अदनान सामीचे ट्वीट... 
 

 

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामीने दिल्या होत्या शुभेच्छा... 
अदनानने संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्या या पोस्टमुळे यूजरने त्याला हा प्रश्न केला होता. या ट्वीटव्यतिरिक्त अदनानला लोकांनी काश्मीरच्या मुद्यावरही आपले मत मांडण्याची विनंती केली. त्याचे उत्तर देत अदनान सामीने ट्वीट केले, 'काश्मीर नेहमीपासून भारताचा एक भाग आहे, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये तुमचे नाक घालू नका, ज्याच्याशी तुमचे काहीही घेणे देणे नाहीये.' सामीच्या या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

अदनान सामीचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...