आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : स्वातंत्र्य दिनापासून काही पाकिस्तानी ट्रोलर्स ट्विटरवर सिंगर अदनान सामीवर निशाणा साधत आहेत. त्याने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे एका व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या जन्मस्थळाबद्दल त्याला प्रश्न केला. अशाचप्रकारचे प्रश्न सतत त्याला विचारले जात आहेत. पण सिंगर आपल्या उत्तरांनी त्यांची बोलती बंद करत आहे.
शनिवारी पुन्हा एकदा पाक ट्रोलरने अदनानला ट्वीट करून लिहिले की, 'तू एक खोटे अकाउंट बनवले आणि मग देखावा केला की, ते खरे आहे आणि त्याला रोस्ट करत आहेस... वा अदनान सामी तू खरंच पाकिस्तानचा द्वेष करतो का ?' या ट्वीटला उत्तर देत सिंगरने लिहिले, 'नाही, माझ्या प्रिय.. मी फेक अकाउंट नाही बनवले आणि ना काही कुणाला रोस्ट करत आहे, मी त्यापैकी नाहीये.. असे तर तुमची आर्मी करते.'
अदनान सामीचे ट्वीट...
पित्याच्या जन्मस्थळाबद्दलही अदनानला विचारले होते प्रश्न...
सिंगर अदनान सामी याला एका पाकिस्तानी व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या जन्मस्थळाबद्दल विचारले. ज्याचे कडक उत्तर देत त्याने उजरची बोलती बंद केली. ट्रोलरने गुरुवारी ट्विटरमध्ये अदनानला विचारले होते, 'तुझे वडील कुठे जन्मले होते आणि कुठे त्यांचे निधन झाले ?' अदनानने ट्रोलरला उत्तरदेत लिहिले, 'माझे पिता 1942 मध्ये भारतात जन्मले आणि 2009 मध्ये भारतातच कालवश झाले. पुढे आणखी काही जाणून घ्यायचे आहे ?'
अदनान सामीचे ट्वीट...
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामीने दिल्या होत्या शुभेच्छा...
अदनानने संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्या या पोस्टमुळे यूजरने त्याला हा प्रश्न केला होता. या ट्वीटव्यतिरिक्त अदनानला लोकांनी काश्मीरच्या मुद्यावरही आपले मत मांडण्याची विनंती केली. त्याचे उत्तर देत अदनान सामीने ट्वीट केले, 'काश्मीर नेहमीपासून भारताचा एक भाग आहे, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये तुमचे नाक घालू नका, ज्याच्याशी तुमचे काहीही घेणे देणे नाहीये.' सामीच्या या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.