इस्लामाबाद - एका अमेरिकी नागरिकाने पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोरला (जंगली प्रजातीचा बकरा) मारण्यासाठी रेकॉर्डब्रेक सर्वात जास्त किंमत माेजली अाहे. ब्रायन किन्सल हर्लान असे त्याचे नाव असून, शिकारीसाठी त्याने १ लाख १० हजार डॉलर्सचे (सुमारे ७८ लाख रुपये) परवाना शुल्क भरले. या प्राण्याचा पाकमध्ये सुरक्षित प्रजातींत समावेश केला गेला असून, त्याच्या शिकारीची परवानगी नाही. सरकार या प्राण्याच्या शिकारीसाठी केवळ 'ट्रॉफी हंटिंग' कार्यक्रमांतच मंजुरी देते. 'ट्रॉफी हंटिंग सीझन २०१८-१९'मध्ये अातापर्यंत देश-विदेशातील शिकाऱ्यांनी ५० जंगली जनावरांची शिकार केलीय. गत महिन्यात या शिकार प्रोग्राममध्ये इतर दाेन अमेरिकी नागरिकांनी सर्वोच्च प्रजातीच्या अॅस्टोर मारखोरच्या शिकारीसाठी १,०५,००० व १,००,००० डॉलर्सची रक्कम परवाना शुल्कापाेटी भरली. प्रशासन या रकमेतील ८० % भाग स्थानिक नागरिकांना देते व उर्वरित रक्कम प्राण्यांच्या देखभालीसाठी स्वत:कडेच ठेवते.