आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कराची - पाकिस्तानची माजी सुपरमॉडेल आलिया झैदी हिने कराचीत अंबानी थीमवर फेक पार्टी आयोजित केली. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पार्टीला येणाऱ्या प्रत्येकाने बॉलिवूड कलाकारांचे मुखवटे लावले होते. त्यामध्ये काही जण अमिताभ बच्चन, काही ऐश्वर्या राय बच्चन तर काही चक्क शाहरुख खानचे चेहरे लावून पोहोचले होते. रिलायंस उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विवाह सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळेच, आपण पार्टीचे थीम अंबानी ठेवले होते असे आलियाने म्हटले आहे.
जागांनाही दिली डुप्लिकेट नावे...
यात आलियाने आपली मैत्रीण आणि मॉडेल फ्रेहा अल्ताफला बियोन्ससारख्या लुकमध्ये परफॉर्म करण्यास सांगितले होते. या पार्टीचा हेतू अब्जाधीशाची बरोबरी करणे नव्हे, तर छोट्या बजेटमध्ये मोठ्या पार्टीचा अनुभव मिळवणे होता असेही तिने म्हटले आहे. पार्टीला थाट मिळवून देण्यासाठी कार्यक्रमात ठिक-ठिकाणी फेक स्पॉट तयार करण्यात आले होते. एका ठिकाणी 10 कोटी डॉलरची पार्टी, तर दुसऱ्या एका ठिकाणी 26 कॅरेटच्या सोन्याची भिंत असे लिहिले होते. यासोबतच एका फेक हत्तीच्या बाजूला दोन कोटींचा हत्ती असे लिहिले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.