आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे लष्करी प्रशासकीय मुख्यालय उडवले: भारताने राजौरी, पूंछच्या हल्ल्यांचा काढला वचपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - भारतीय लष्कराने जम्मू-काश्मिरात नियंत्रण रेषेपार पाकिस्तानचे लष्करी प्रशासकीय मुख्यालय उध्वस्त केले आहे. पाक लष्कराने २१ ऑक्टोबरला भारतातील राजौरी व २३ ला पूंछ व झल्लाहमध्ये हल्ले केले होते. त्याचा वचपा भारताने काढला. कारवाईचे उपग्रह फोटोही समोर आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील खुइरट्टा व सामानी भागांत क्षेपणास्रे डागली. त्यात पाकचे लष्करी प्रशासकीय मुख्यालय उध्वस्त झाले. यात पाकच्या लष्कराने प्रचंड नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

कारवाईआधी सीमाभागातील गावे रिकामी करण्यात आली होती.२१ ऑक्टोबरला राजौरीच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकच्या बॅट टीमच्या हल्ल्यात भारताचे ३ जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकला सज्जड दमही दिला होता. तेव्हापासून सीमेवरील तणाव आणखी वाढला होेता.

बातम्या आणखी आहेत...