आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan's Goodwill For Votes Is An Injustice To Muslims In The Country; CM Criticizes Sharad Pawar's Statement

मतांसाठी पाकिस्तानची भलामण हा देशातील मुस्लिमांवर अन्याय; शरद पवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘भारतातील मुसलमानांना आपल्या देशाचा अभिमान आहे. त्यांच्यासमाेर पाकिस्तानची प्रशंसा केल्यानंतर ते आपल्याला मते देतील, असे शरद पवारांना वाटत असेल तर ते येथील मुस्लिमांवर अन्याय करणारे असेल. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या मानसिकतेत आली आहे हे त्यावरून स्पष्ट होते,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

‘मी पाकिस्तानात गेलाे तेव्हा माझे चांगले स्वागत झाले हाेते. भारतातील नातलगांना भेटण्यासाठी भलेही पाकिस्तानातील लाेक येऊ शकत नसतील, मात्र तिथे जाणाऱ्या भारतीयांचे ते पाहुणे म्हणूनच स्वागत करतात,’ असे वक्तव्य शरद पवारांनी रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात केले हाेते. त्यावर टीकेची झाेड उठली हाेती. कराडमध्ये साेमवारी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ पवार ज्येष्ठ अाहेत. असे विधान करताना हा विचार केला पाहिजे की आपल्या वक्तव्याचा लाभ भारताला होईल की पाकिस्तानला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अशा प्रकारे काश्मीरविषयी केलेल्या विधानाचा उपयोग पाकिस्तानने भारताविरुद्ध तक्रार करण्यासाठी केला. निवडणुकीत मते मिळावीत यासाठी अशा प्रकारे बोलणे योग्य नाहीच,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

केवळ अनुभव सांगितला : पवार
पाकबद्दलच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, ‘पाकमधील पाहुणचाराबद्दल आपण जाहीर सभेत बोललो नव्हताे. तर बीसीसीआयच्या दौऱ्यादरम्यान आलेला अनुभव केवळ कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितला हाेता.’