आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरुद्ध पाककडून मसूद, अाबिद, अजहर व आझमची शतके, २३७५ कसाेटीत फक्त दुसऱ्यांदा एका डावात टाॅप-४ फलंदाजांची शतके

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानला विजयासाठी ३ बळींची अाहे गरज

कराची- यजमान पाकिस्तान संघाने अापल्या घरच्या मैदानावर अायाेजित कसाेटी सामन्यात विक्रमाला गवसणी घातली अाहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावामध्ये पाकिस्तान संघाच्या टाॅप-४ फलंदाजांनी शानदार शतकी खेळी केली. यामध्ये पाकच्या  शान मसूद (१३५), अाबिद अली (१७४), अझहर अली (११८) अाणि बाबर आझम (नाबाद १००) यांच्या शतकाचा समावेश अाहे. यासह पाकच्या टीमकडून कसाेटीच्या इतिहासामध्ये अाता  नव्या विक्रमाची नाेंद झाली अाहे.


कसाेटीच्या इतिहासात अातापर्यंतच्या २३७५ कसाेटीमध्ये फक्त दुसऱ्यांदाच  अशा प्रकारची विक्रमी खेळी नाेंद झाली अाहे. दुसऱ्यांदा काेणत्याही संघाच्या टाॅप-४ फलंदाजांनी  एकाच  डावात शतक साजरे केले. अाता पाकच्या  टीमला अाता विजयाची संधी अाहे. यासाठी पाकला तीन विकेटची गरज अाहे. ४७६ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका दुसऱ्या डावात ७ बाद २१२ धावांवर अाहे. टीमला विजयासाठी २६४  धावांची गरज अाहे.

पहिला विक्रम भारताच्या नावे : 

यापुर्वी २००७ मध्ये डावात भारताच्या टाॅप-४ फलंदाजांनी पहिल्यांद अशी विक्रमी शतकी खेळी केली हाेती. यात दिनेश कार्तिक (१२९), वसीम जाफर (नाबाद १३८), राहुल द्रविड़ (१२९) अाणि सचिनने (नाबाद १२२) यांनी बांगलादेश संघाविरुद्ध शतकी खेळी केली हाेती.  भारतीय संघाने कसाेटीमध्ये पहिला विक्रम केला.