आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan's Player Will Not Play In Asia XI: BCCI, 2 T20 Matches Between Asia XI And World 11 In Bangladesh In March

एशिया इलेव्हनमध्ये पाकचा खेळाडू नसेल : बीसीसीआय, मार्चमध्ये बांगलादेशमध्ये एशिया इलेव्हन व वर्ल्ड 11 यांच्यात 2 टी-20 सामने

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) मार्चमध्ये एशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामन्यांचे आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती शेख मुजिबुुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीसीबी हे आयोजन करत आहे. आयसीसीने दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिला अाहे.

एशिया इलेव्हनमध्ये पाच भारतीय खेळाडू आहेत. मात्र, बीसीसीआयने स्पष्ट केले की, एशिया इलेव्हनमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू नसेल. बीसीसीआये संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी म्हटले की, भारत व पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत खेळण्याची कोणतीही संधी नाही. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंना बोलावण्यात आले नाही. मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली भारताकडून खेळणाऱ्या पाचव्या खेळाडूचे नाव निश्चित करतील. श्रीलंकन टीमने काही दिवसांपूर्वी पाकमध्ये दोन कसोटी खेळल्या. १० वर्षांनी येथे कसोटी खेळवण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी भारताच्या तुलनेत पाक अधिक सुरक्षित असल्याचे म्हटले. पाकिस्तानचे माजी कर्णधार व यष्टिरक्षक राशिद लतीफने म्हटले सौरव गांगुलीचा ४ तगड्या देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तो पूर्णपणे अपयशी ठरेल.
 

बातम्या आणखी आहेत...