टीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाच्या / टीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, 10 दिवसांनंतर बॉयफ्रेंडसोबत बोहल्यावर चढणार, प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले सेलेब्स 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 01,2019 10:40:00 AM IST

एन्टटेन्मेंट डेस्क. 'लाडो 2' या टीव्ही शोची अभिनेत्री पलक जैन आपला बॉयफ्रेंड अॅक्टर तपस्वी मेहतासोबत 10 फेब्रुवारी रोज साताजन्माच्या गाठीत अडकणार आहे. पकलच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. सासरच्या लोकांनी सुन पलकला शगुनची चुनरी दिली. यावेळी सुयश राय, किश्वर मर्चेंट, कुणाल जयसिंह, रोनित रायसोबतच अनेक सेलेब्स उपस्थित होते.


इंदूरमध्ये होणार लग्न
- पलक आणि तपस्वीचे लग्न इंदूरमध्ये होणार आहे. इंदूर हे पलकचे मुळ गाव आहे. पलकने सांगितले होते की - 'मी मुंबईमध्ये लग्न करु शकले असते, पण काही कारणांमुळे मी इंदूरची निवड केली. हे माझे मुळ गाव आहे आणि मला वाटत होते की, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी काही दिवसांची सुटी घेऊन लग्नात सहभागी व्हावे.'
- पलकची हळदी, मेंदी आणि संगीत सेरेमनचे आयोजन 7,8,9 फेब्रुवारीला आहे. यावेळी अनेक टीव्ही सेलेब्स उपस्थित असणार आहेत.

8 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात
पलक आणि तपस्वी एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतात. दोघांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. पलकने 'ईशान : सपनो को आवाज दे' हा टीव्ही शो पाहिला होता तेव्हापासून ती तपस्वीची चाहती आहे. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि याचे रुपांतर प्रेमात झाले.
- रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर पलक-तपस्वी न्यूझीलँडमध्ये हनीमूनसाठी जाणार आहेत.

X
COMMENT