आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रपाळीला सुरू होते ही जिल्हा परिषद शाळा, महाराष्ट्राभर आहे या शाळेची चर्चा; कारणही आहे तसे खास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर : महाराष्ट्रातील एका गावात रात्रीच्या वेळी शाळा सुरू केली जाते. फक्त शाळाच सुरू होते असे नाही तर मुले देखील अगदी शिक्षणाच्या ओढीने या शाळेत येत आहेत. येथे शालेय शिक्षणासोबत योगा आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यात येते. आपल्या या विशेषतेमुळे महाराष्ट्रामध्ये या शाळेची चर्चा आहे. 

 

3 शिक्षकांवर आहे 123 विद्यार्थ्यांची जबाबदारी

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह गावात ही शाळा आहे. जिल्हा परिषदची ही शाळा संध्याकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान सुरू असते. येथे इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतचे वर्ग चालतात. येथील तीन शिक्षकांवर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. संध्याकाळी सुरू होणाऱ्या या शाळेत तब्बल 123 विद्यार्थी आहेत. पण या शाळेत फक्त दोनच खोल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. कमी वर्गखोल्या असल्यामुळे बरेच वर्ग हे झाडाखाली तर कधी रस्त्यावर भरविण्यात येतात. 

 

शाळेसाठी गावकऱ्यांनी केली मदत

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. शाळेत खोल्या निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी 2 लाख रूपये वर्गणी गोळा असून ती शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा या शाळेला सुट्टी नसते. कारण त्यादिवशी मुलांकडून सामान्य ज्ञान आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेतली जाते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी सांगितले की, मुलांमध्ये अभ्यासाची खूपच गोडी निर्मीण झाली आहे. रात्री शिक्षक घरी गेल्यानंतरही मुले शाळेत अभ्यास करत असतात. यासाठी ग्रामस्थांवर त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ]

बातम्या आणखी आहेत...