आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेडियममध्ये धावपटू पालेंद्रची आत्महत्या: पैशांवरून वडिलांशी होता वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू पालेंद्र चौधरीने (१८) पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पालेंद्रला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारांदरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. साई महासंचालकांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेच्या आधी मंगळवारी फोनवर पालेंद्रचा वडिलांशी पैशांवरून वाद झाला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...