आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; राज्य सुजलाम-सुफलाम व्हावे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापुजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पहाटे तीन वाजता हा पुजाविधी पार पडली. यावेळी लातूरच्या सुनीगाव येथील मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी गंगुबाई चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पुजा करण्याची संधी मिळाली. राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला घातले. आषाढी एकादशीनिमित्त भाविक लाखोंख्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत.

 

पंढरपुरात आल्यानंतर मला आनंदच होतो. येथे आल्यानंतर विठ्ठाला आशीर्वाद मिळतो. राज्य सुजलाम-सुफलाम होऊ अशी मागणी विठ्ठलाकडे केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आम्ही चंद्रभागा नदीला स्वच्छ करण्याचे अभियान सुरु करणार आहे. 

 

गेल्यावर्षी मुख्यमंत्री करु शकले नाही पुजा 
गेल्या वर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या विरोधानंतर मुख्यमंत्री शासकीय महापूजा करू शकले नाही. पण आता राज्यात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले आहे. यामुळे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. 

 

चव्हाण दाम्पत्याला मोफत बस पास 
राज्य परिवहन महामंडळाकडून राज्य भरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष 3500 बसेसची व्यवस्था केली आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत पुजा करणाऱ्या लातूरच्या चव्हाण दाम्पत्याला एका वर्षासाठी फ्री बस पास देण्यात आला आहे. या महापुजेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, जल संधारण राज्य मंत्री विजय शिवरात्रे, कृषी मंत्री अनिल बोंडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आदींचा सहभाग होता. 

बातम्या आणखी आहेत...