आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या हातावर विविध प्रकारच्या रेषा असतात- उदा. आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर भाग्य रेषा सांगते की, व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही. हस्तरेषा संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी, महिलांच्या डाव्या आणि पुरुषाच्या उजव्या हाताचे अध्ययन आवश्यक आहे.
कुठे असते भाग्य रेषा
भाग्य रेषा आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत (मधल्या बोटाखालील भाग शनी पर्वत असतो)पर्यंत जाते.
> एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधापासून सुरु होऊन शनी पर्वतापर्यंत जात असेल आणि दोष रहित असल्यास, व्यक्ती भाग्यशाली राहतो. हे लोक जीवनात विशेष यश प्राप्त करतात.
> हातामध्ये भाग्य रेषा आयुष्य रेषेपासून सुरु होत असल्यास व्यक्ती कुटुंबियांच्या मदतीशिवाय स्वतःच्या कष्टाने भरपूर धन प्राप्त करतो.
> ज्या लोकांच्या हातावर भाग्य रेषा चंद्र क्षेत्रापासून सुरु झाले असेल ते लोक इतरांच्या मदत किंवा प्रोत्साहनाने यश प्राप्त करणारे असतात.
> चंद्र पर्वतापासून निघून एखादी रेषा भाग्य रेषेसोबत चालत असेल तर अशा व्यक्तीचे लग्न अत्यंत धनी कुटुंबात होते. असा व्यक्ती एखाद्या स्त्रीच्या मदतीने यश प्राप्त करतो.
> भाग्य रेषा रिंग फिंगरपर्यंत जात असल्यास हा अशुभ योग आहे. अशा व्यक्तीला स्वतःच्या चुकांमुळे नुकसान सहन करावे लागते.
> भाग्य रेषेने हातावर एखाद्या ठिकाणी आयुष्य रेषेला कापले तर व्यक्तीला अपमान किंवा एखाद्या कलंकाला सामोरे जावे लागते.
> भाग्य रेषा हाताच्या मुळापासून जेवढा दूरवरून सुरु होते, व्यक्तीचा भाग्योदय तेवढ्याच उशिराने होतो.
> भाग्य रेषा तुटलेली किंवा इतर रेषांनी कापलेली असल्यास हा भाग्यहीनताचा संकेत आहे.
> भाग्य रेषा हृदय रेषेवर थांबली असल्यास व्यक्तीला प्रेम संबंधामुळे अपयश प्राप्त करावे लागते, परंतु ही रेषा हृदय रेषेपासून गुरु पर्वतापर्यंत पोहोचल्यास व्यक्तीला प्रेम संबंधामध्ये यश प्राप्त होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.