हातावर अर्धा चंद्र / हातावर अर्धा चंद्र तयार होत असलेले लोक इतरांपासून लपवतात स्वतःच्या भावना

Aug 10,2018 12:03:00 AM IST

ज्योतिष शास्त्रामधील सर्वात खास विद्या म्हणजे हस्तरेषा. या विद्येमध्ये हाताची बनावट आणि हतवारील रेषांचा अभ्यास करून भविष्य आणि स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. हातावर रेषांपासून विविध शुभ-अशुभ चिन्ह तयार होतात. असेच एक शुभ चिन्ह म्हणजे अर्ध चंद्र. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, या शुभ चिन्हाशी संबंधित काही खास गोष्टी...


कसा तयार होतो चंद्र
हातावर करंगळीच्या खाली हृद्य रेषा असते. ही रेषा दोन्ही हातावर असते आणि दोन्ही हात जोडल्यानंतर हृदय रेषा एकत्र आल्यामुळे चंद्र तयार होतो. हे शुभ चिन्ह फार कमी लोकांच्या हातावर तयार होते.


अर्धा चंद्र तयार झाल्यास
> ज्या लोकांचे दोन्ही हात जोडल्यानंतर अर्धा चंद्र तयार होतो, ते लोक आकर्षक स्वभावाचे असतात.
> हे लोक जोडीदाराविषयी जास्त भावुक असतात आणि पार्टनरला सर्व सुख देण्याचा प्रयत्न करतात.
> हे लोक आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. यांची बुद्धी खूप तल्लख असते आणि कोणतीही गोष्ट लगेच समजून घेतात.
> या शुभ चिन्हाच्या प्रभावाने हे लोक कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

हृदय रेषा एकत्र केल्यानंतर सरळ रेषा तयार झाल्यास > दोन्ही हात जोडल्यानंतर सरळ रेषा तयार होत असेल तर हे लोक शांत आणि दयाळू स्वभावाचे असतात. > यांना प्रत्येक काम आरामात करणे आवडते. फार कमी लोकांच्या हातावर अशी सरळ रेषा तयार होते.अर्धा चंद्र तयार नाही झाला किंवा हृदय रेषा जुळल्या नाहीतत तर > हात जोडल्यानंतर चंद्र तयार होत नसेल किंवा हृदय रेषा जुळत नसतील तर हे लोक थोडेसे हलगर्जी स्वभावाचे असतात. > दोन्ही हात जोडल्यानंतर हृदय रेषा वाकडी-तिकडी दिसत असल्यास अशा लोकांना त्यांच्याबद्दल कोण काय बोलतंय याचा काहीही फरक पडत नाही.
X