आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 8 संकेत सांगतात तुम्ही कधी विदेशात जाऊ शकणार की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना थायलंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या सुंदर देशांमध्ये फिरायला जाण्याची इच्छा असते परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हाताचे काही असे योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्ती विदेशात जाणार की नाही याविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, विदेश यात्रेशी संबंधित हस्तरेषेचे काही खास योग...


1. हस्तरेषेनुसार एखादी रेषा आयुष्य रेशपासून निघून भाग्य रेषेला कापत हाताच्या दुसऱ्या बाजून चंद्र पर्वतावर जात असेल तर व्यक्तीला विदेश प्रवासाची संधी प्राप्त होऊ शकते. ही रेषा जेवढी स्पष्ट असेल विदेशात तेवढा जास्त वेळ राहण्याची संधी मिळते. ही रेषा बारीक असल्यास कमी काळासाठी विदेशात जाण्याची संधी मिळते.


2. करंगळीच्या खाली बुध पर्वतापासून एखादी रेषा निघून सूर्य पर्वत म्हणजे अनामिक बोटापर्यंत जात असेल तर असा व्यक्ती जीवनात अनेकवेळा विदेश प्रवास करतो. यांना आयुष्यात सहजपणे यश प्राप्त होत नाही. आपल्या मेहनतीने हे यश मिळवतात.


3. चंद्र पर्वत म्हणजे हाताच्या दुसऱ्या भागातून एखादी रेषा निघून शनी पर्वत म्हणजे मधल्या बोटापर्यंत पोहोचत असेल तर अशा व्यक्तीचा भाग्योदय जन्मस्थानपासून दूर ठिकाणी होतो. ही रेषा शनी पर्वतावर विविध शाखांनी विभागली गेली असेल तर यांना आयुष्यात कधीही पैसा कमी पडत नाही.


4. चंद्र पर्वतावर त्रिभुज चिन्ह असल्यास विदेश यात्रेचे योग जुळून येतात.


5. हातावरील रेषांव्यतिरिक्त तिळाच्या आधारे समजू शकते की तुमची विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होणार की नाही. उजव्या भुवयीजवळ तीळ असल्यास व्यक्ती व्यापारात यशस्वी होतो आणि विदेश यात्रेचे योग जुळून येतात.

बातम्या आणखी आहेत...