आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील 6 तीळ सांगतात यश आणि अडचणींशी संबंधित खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातावरील रेषा आणि हाताची बनावट पाहून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावाविषयी सांगणाऱ्या विद्येला हस्तरेषा विद्या म्हणतात. काही लोकांच्या हातावर तीळ असतात. या तिळांचा व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावावर प्रभाव पडत असतो. हस्तरेषा विद्येच्या मदतीने समजू शकते की, हातावर कोणत्या ठिकाणी तीळ असल्यास व्यक्तीवर त्याचा कसा प्रभाव राहतो. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य आणि हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावर तीळ आणि त्यांचे फलादेश...


1. एखाद्या व्यक्तीच्या हातावर शुक्र पर्वतावर तीळ असल्यास त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये पावित्र्य नसते. असे लोक नकारात्मक मानसिकतेचे असतात. शुक्र पर्वत अंगठ्याच्या खाली असतो.


2. ज्या लोकांच्या हातावरील चंद्र पर्वतावर तीळ असेल त्यांनी पाणी (नदी, तलाव, विहीर, समुद्र)पासून सावध राहावे. या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होऊ शकतो. चंद्र पर्वत शुक्र पर्वताजवळ हाताच्या दुसऱ्या बाजूला असतो.


3. गुरु पर्वतावर तीळ असल्यास लग्न जमण्यात अडचणी निर्माण होतात. कोणत्याही कामामध्ये मनासारखे यश प्राप्त होत नाही. हा पर्वत इंडेक्स फिंगरच्या खाली असतो.


4. शनी पर्वतावर तीळ असल्यास लग्न जमण्यास उशीर होतो किंवा वैवाहिक जीवन सुखी राहत नाही. शनी पर्वत मिडल फिंगरच्या खाली राहतो.


5. सूर्य पर्वतावर तीळ असल्यास हा मान-सन्मानासाठी शुभ संकेत नाही. सूर्य पर्वतावर तीळ असल्यास व्यक्तीला समाजात अपमानाला सामोरे जावे लागू शकते. सूर्य पर्वत रिंग फिंगरच्या खाली असतो.


6. एखाद्या व्यक्तीच्या हातावरील बुध पर्वतावर तीळ असल्यास त्याला अचानक एखादे नुकसान होऊ शकते. बुध पर्वत करंगळीच्या खाली असतो. हातावर अशी स्थिती निर्माण झाल्यास प्रत्येक काम सावध राहून करावे.

बातम्या आणखी आहेत...