आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्य सांगणाऱ्या रेषेच्या 10 गोष्टी, यावरून समजते तुम्ही श्रीमंत होणार की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा - आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे का नाही.


कोठे असते भाग्य रेषा -
भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनि पर्वता( मधल्या बोटाखालील भागाला शनि पर्वत म्हणतात) कडे जाते.


भाग्य रेषेचा फलादेश
1-
एखाद्या व्यक्तीच्या हातावर दोन भाग्य रेषा असल्यास समजावे की, त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख-सुविधा मिळू शकतात. भाग्याची मदत मिळते तसेच धनवानही बनतो.


2- जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधपासून प्रारंभ होऊन शनि पर्वताकडे गेलेली असेल तसेच दोष रहित असेल तर अशी व्यक्ती भाग्यशाली असते. अशा व्यक्ती जीवनात यश प्राप्त करतात.


3- जर हातावरील भाग्य रेषा आयुष्य रेषेपासून सुरु होत असेल तर अशा व्यक्ती स्वत:च्या मेहनतीने अधिक धन प्राप्त करतो.


4- ज्या व्यक्तींच्या हातामध्ये भाग्य रेषा चंद्र क्षेत्रापासून प्रारंभ झालेली असेल अशा व्यक्ती दूस-यांची मदत अथवा प्रोत्साहनाने यश मिळवणारे असतात.


5- जर भाग्य रेषा चंद्र पर्वताहून निघून एखाद्या दुस-या भाग्य रेषेसोबत जात असेल तर, अशा व्यक्तींचे लग्न अत्यंत श्रीमंत परिवारात होते. तसेच या व्यक्ती एखाद्या स्त्रीच्या मदतीने यश प्राप्त करतात.


6- जर भाग्य रेषा मधल्या बोटापर्यंत (मिडिल फिंगर) जात असल्यास हे अशुभ योग असल्याचे दर्शवते. अशा व्यक्ती स्वत:च्या चुकांमुळे अडचणीत येतात.

बातम्या आणखी आहेत...