Home | News | Paltan Laila Majnu Gali Guleiyan Fail In Front Of Stree

'स्त्री'शक्ती समोर टिकू शकला नाही 'पलटन', नवे-जुने सर्वच कलाकार फेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:13 PM IST

शुक्रवारी चार चित्रपट एकत्र रिलीज झाले. तरीही गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'स्त्री' चित्रपटाचा दबाव बॉक्सऑफिसवर कायम र

 • Paltan Laila Majnu Gali Guleiyan Fail In Front Of Stree

  एन्टटेन्मेंट डेस्क: शुक्रवारी चार चित्रपट एकत्र रिलीज झाले. तरीही गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'स्त्री' चित्रपटाचा दबाव बॉक्सऑफिसवर कायम राहिला. नवे रिलीज झालेले चारही चित्रपट 'स्त्री'च्या शक्तीपुढे टिकू शकले नाही. शुक्रवारी रिलीज झालेले दोन चित्रपट 'गली गुलियां' आणि 'पलटन'मध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार होते तर 'लैला मजनू' चित्रपटातून दोन अॅक्टर्सने डेब्यू केला होता. तर चौथा हा हॉलिवूडमधील हॉरर 'द नन' हा आहे. या चारही चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आले आहे. यामध्ये तीन चित्रपटांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. तर हॉलिवूड फिल्म 'द नन'च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन इतर तिन चित्रपटांपेक्षा चांगले आहे.

  'स्त्री'ने 8 दिवसात जवळपास 65 कोटींची कमाई केली आहे
  - राजकुमार राव आणि श्रध्दा कपूरच्या 'स्त्री' चित्रपटाचा जलवा आठवडाभरानंतरही कमी झालेला नाही. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार स्त्री चित्रपटाने 8 दिवसात जवळपास 65 कोटींची कमाई केली आहे.
  - चित्रपटाचे समीक्षक सुमित कादलने 'गली गुलिया', 'पलटन' आणि 'लैला मजनू'ची सोशल मीडियावर वाईट ओपनिंग झाल्याची माहिती दिली होती.
  - चित्रपटाचे समीक्षक गिरीश जौहरने सांगितले की, 'पलटन' चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 1.5 कोटींचे कलेक्शन केले. तर रिपोर्ट्सनुसार 'लैला मजनू' चित्रपटाचे कलेक्शन जवळपास 90 लाख आणि 'गली गुलियां'चे कलेक्शन जवळपास 1 कोटी रुपये होते. हे तिन्ही चित्रपट ओपनिंग डेला जादू दाखवू शकले नाहीत.

  हॉलिवूड चित्रपटाला मिळाला चांगला रिस्पॉन्स
  या तिन्ही चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूड चित्रपट 'द नन'ला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला. चित्रपटाचे समीक्षक गिरीश जौहरने 'द नन' फिल्मचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन जवळपास 3 कोटींपर्यंत असल्याचे सांगितले आहे. तर तरण आदर्शने 'द नन'ला चांगली ओपनिंग मिळाल्याचे सांगितले आहे. 'द नन' 'कंज्यूरिंग' सीरीजचा नवा चित्रपट आहे.


  200% पेक्षा जास्त फायदा
  रिपोर्ट्सनुसार राजकुमार राव आणि श्रध्दा कपूरच्या 'स्त्री' चित्रपटाला 200 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा झाला आहे. डायरेक्टर अमर कौशिकचा हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

Trending