आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क - जापानी कंपनी पॅनासोनिकने शुक्रवारी (19 जुलै) भारतीय बाजारात एकूण 14 नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले. यामध्ये 4K एचडीआर एलईडी टीव्हीच्या GX600 रेंजसह 75 इंचाची फ्लॅगशिप टीव्ही आणि अफोर्डेबल टीव्हींचा समावेश आहे. अफोर्डेबल टीव्हीची स्क्रीन साइज 32 इंचपासून सुरु होतो. तर GX600 रेंजची किंमत 50,400 रुपये ते 2 लाख 76 हजार 900 रुपये आहे.
सर्व टीव्हींत मिळणार वॉयस असिस्टंट सपोर्ट
> पॅनासोनिकने आपल्या 75 इंचच्या फ्लॅगशिप टीव्हीबाबतची कोणतीही अधिक माहिती जारी केली नाही. पण हा टीव्ही GX940 सीरीज असून तो इतरही बाजारात उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.
> GX600 सीरीजमध्ये 43 इंचापासून 65 इंच स्क्रीनचे टीव्ही उपलब्ध आहेत. या सर्वांत 4K एचडीआर एलईडी पॅनल मिळत आहे.
> या स्मार्ट टीव्ही रेंजमध्ये गुगल असिस्टंट आणि अॅमेझॉन अलेक्सा, माय होम 3.0 इंटरफेस आणि डॉल्बी व्हिजन एचडीआरसारखे फीचर सपोर्ट करतील.
> हे टीव्ही नेटफ्लिक्स आणि युट्यूब सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मलाही सपोर्ट करतात. यामध्ये एचसीएक्स प्रोसेसर असून ते 4K आणि एचडीआर कंटेंटसोबत चांगले प्रदर्शन करू शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.