आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Panasonic Lumix DC S1H Full Frame Mirrorless Camera Launched With 6K Video Recording

जगातील पहिला 6K रेकॉर्डिंग असलेला कॅमेरा लॉन्च, सिनेमा क्वालिटी व्हिडिओ करेल शूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- पॅनासोनिक लुमिक्सने नवीन DC-S1H कॅमरा लॉन्च केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट डिजिटल सिंगल-लेंस फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा आहे. यातून सिनेमा क्वालिटी व्हिडिओ आउटपुट मिळेल. हा लुमिक्स DC-S1 आणि DC-S1R सीरीजमधील कॅमेरा आहे. हे सर्व कॅमरे प्रोफेशनल-ग्रेड आणि फुल-फ्रेम मिररलेस आहेत. लुमिक्स DC-S1H सेंसर रेजोल्यूशनला 24.2-मेगापिक्सलपर्यंत सेट करता येते. विशेष म्हणजे हा जगातिल पहिला 6K रेजोल्यूशन असलेला कॅमेरा आहे.

कॅमराचे फीचर्स
लुमिक्स DC-S1H मध्ये फुल V-Log/ V-Gamut सोबतच डायनामिक रेंजचे 14 प्लस स्टॉप्स दिले आहेत. हा 6K फुल फ्रेम कॅप्चर करतो. तर, 4:2:2 10-बिट इंटरनल रेकॉर्डिंग आणि सिनेमा 4K रिकॉर्डिंग(60p)ला सपोर्ट करतो.
 
कंपनीच्या प्रेस रिलीजनुसार हा 6K (24p) रेकॉर्डिंग असलेला पहिला कॅमेरा आहे. यात डुअल नेटिव ISO दिले आहेत. तर, याची व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान मैक्सिमम ISO 51200 आहे.
 
कंपनीने यात हीट डिस्प्रेशन टेक्नोलॉजी दिली आहे. यात 5.9K/30p (16:9 आसपेक्ट रेशियो) आणि 10-बिट 60p 4K/C4K व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करता येते.
 
व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हेंडलिंगदरम्यान शेकी शॉट्सला हे अवॉयड करतो. कंपनीने यात अनलिमिटेड रेकॉर्डिंग टाइम फीचरदेखील दिले आहे.
 
लुमिक्स DC-S1H मध्ये 5-अॅक्सिस बॉडी इमेज स्टेबलाइज्ड आणि 2-अॅक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेश दिले आहे. यामुळे स्लो शटर स्पीडदरम्यान स्थिर व्हिडिओ शूटींमध्ये मदत मिळते.
 
पॅनासोनिक लुमिक्स DC-S1H ची किंमत 4000 डॉलर (अंदाजे 2.90 लाख) रुपये आहे. ही याच्या फक्त बॉडीची किंमत आहे. 

बातम्या आणखी आहेत...