आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकाच्या 5 दिवसांमध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक काम शुभ मुहूर्त पाहून केले जाते. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ वेळेला करण्यात आलेल्या कार्याचे मनासारखे फळ प्राप्त होत नाही. याच कारणामुळे पंचक काळात अनेक शुभकार्य करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार पंचकमध्ये शतभिषा, भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. यावेळी 15 नोव्हेंबरला गुरुवार रात्री जवळपास 08.40 पासून पंचक सुरु होईल आणि हे 20 नोव्हेंबर मंगळवारी संध्याकाळी 05.15 पर्यंत राहील. येथे जाणून घ्या, किती प्रकारचे असतात पंचक...


1. रोग पंचक
रविवारी सुरु होणार्‍या पंचकाला रोग पंचक म्हणतात. याच्या प्रभावाने हे पाच दिवस शारीरिक आणि मानसिक अडचणींचे राहतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य करू नये. प्रत्येक प्रकरच्या मंगलकार्यामध्ये हे पंचक अशुभ मानण्यात आले आहे.


2. राज पंचक
सोमवारी सुरु होणार्‍या या पंचाकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावाने पाच दिवसांमध्ये सरकारी कामामध्ये यश प्राप्त होते. राज पंचकमध्ये संपत्तीशी संबंधित कार्य करणे शुभ राहते.


3. अग्नि पंचक
मंगळवारी सुरु होणार्‍या या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट प्रकरण, वाद इ. गोष्टींचे निर्णय, स्वतःचा हक्क मिळवून देणारे काम केले जाऊ शकतात. या पंचकामध्ये अग्नीची भीती राहते. हे अशुभ आहे. या पंचकामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य, अवजार आणि मिशनरी कामांची सुरुवात अशुभ मानली गेली आहे. यामुळे नुकसान होऊ शकते.


4. मृत्यू पंचक
शनिवारी सुरु होणार्‍या या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावावरूनच लक्षात येथे की, अशुभ दिवसापासून सुरु होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रासदायक ठरू शकते. या पाच दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे धाडसी काम करू नये. याच्या प्रभावाने वाद, दुखापत, दुर्घटना होण्याची शक्यता राहते.


5. चोर पंचक
शुक्रवारी सुरु होणार्‍या या पंचकाला चोर पंचक म्हणतात. शास्त्रानुसार या पंचाकात प्रवास करणे वर्ज्य मानले गेले आहे. या पंचकात देण्या-घेण्याचे, व्यापार आणि इतर कोणत्याही प्रकारचे सौदे करू नयेत. वर्ज्य सांगण्यात आलेले कार्य केल्यास धनहानी निश्चित आहे. 


6. या व्यतिरिक्त बुधवार आणि गुरुवार या दिवशी सुरु होणार्‍या पंचकात येथे सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या पंचक काळात पाच कामांव्यतिरकीत इतर सर्व शुभ काम केले जाऊ शकतात.


पंचक काळात ही 5 कामे करू नयेत...
1. पंचकादरम्यान घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड जमा करू नये. त्यामुळे अग्निचे भय राहते.
2. पंचक असताना दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण दक्षिण दिशा यमाची दिशा समजली जाते. या नक्षत्रांमध्ये दक्षिण दिशेची यात्रा करणे धोकादायक मानले गेले आहे.
3. पंचकात रेवती नक्षत्र असेल तेव्हा घराचे छत तयार करू नये. त्यामुळे घरात वाद होतात असे म्हटले जाते.
4. पंचक काळात खाट किंबा बाज तयार करणेही अशुभ मानले जाते. तज्ज्ञांच्या मते त्यामुळे मोठे संकट येण्याची शक्यता असते.
5. पंचकामध्ये अंत्यसंस्कार करण्यापूर्वीही सल्ला घ्यायला हला. तसे शक्य न झाल्यास पीठ किंवा गवतापासून पाच पुतळे तयार करून तिरडीवर ठेवावी त्यांचाही पार्थिवाप्रमाणे अंत्यसंस्कार करावा. त्यामुले पंचकाचा दोष कमी होतो, असे गरूड पुराणात म्हटले आहे.


हे शुभ कार्य करू शकतात...
ज्योतिषी पं. विनय भट्ट यांच्या मते पंचकातील नक्षत्रांतही काही शुभ कार्ये केली जातात. पंचकातील उत्तराभाद्रपद नक्षत्रामुळे सर्वार्थसिद्धि योग तयार होतो. तर धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र प्रवास, व्यापार, मौंज, अशा शुभ कार्यांसाठी चांगला मानला जातो.


पंचक अशुभ काळ मानला गेला असला तरी, यादरम्यान साखरपुडा, विवाह अशी शुभकार्येही केली जातात. पंचकात येणार्‍या पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती हे तीन नक्षत्र रविवारी असल्याने आनंदसह तीन शुभ योग तयार होतात. ते चर, स्थिर व प्रवर्ध हे आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पंचकमध्ये नक्षत्रांचे शुभ फळ...

बातम्या आणखी आहेत...