आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायतीने सुनावली क्रूर शिक्षा; युवकाला प्रेमिकाच्या हातून चपलेने बदडले, थुंकी चाटण्यास पाडले भाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिवेणीगंज/सुपौल - जिल्ह्यातील खोरिया मिशन पंचायतने एका व्यक्तीला क्रूर शिक्षा दिल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रेम-प्रसंगाचे आरोप करून युवकाला अगोदर मारहाण केली. यानंतर त्याला चपलीवर थुकण्यास सांगून ते चाटायला भाग पाडले. युवकावर मानव तस्करीचा आरोप लावत त्याला त्रास देण्यात येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना 23 जूनची आहे. 


अभिषेक अलबर्ट असे युवकाचे नाव असून तो दिल्लीला राहतो. पंचायतने युवकाकडून 10 हजारांचा दंड देखील वसूल केला आहे. मारहाणीनंतर युवकाला सोडून देण्यात आले. पण याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पोलिस गर्दीसमोर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत असे युवकाचे म्हणणे आहे. 


काय आहे व्हायरल व्हिडिओत

व्हिडिओत एक युवती एका मुलाच्या तोंडावर चपल मारत आहे. तर आसपासचे लोक युवतीला आणखी जोरात मारण्यास सांगत आहेत. पाठीमागून एक व्यक्ती युवकाला विचारतोय की आजपासून पुन्हा कोणत्या मुलीला बोलवशिल? मुलगा नकारार्थी मान हलवतो. तू परत मेसेज करशील? यावर मुलगा पुन्हा नाही म्हणतो. 


पीडित युवकाने भावाच्या मृत्यूनंतर वहिणीसोबत केले लग्न
व्हिडिओत चप्पल मारत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, अभिषेक त्यांच्या घरच्या नंबरवर मेसेज करत होता. तसेच त्याचे मुलीशी बोलणे व्हायचे. घटनेच्या 5-6 दिवसांपूर्वी युवती अभिषेकच्या बोलवण्यावर त्याला भेटण्यासाठी गेली होती. दोघे लग्नासाठी तयार झाले होते. पण अभिषेक विवाहीत असल्याचे तिला माहीत झाले. अभिषेकने भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज केले होते.