आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Panchkula Chandigarh News Murder Of Husband Of Wife With Lover In Police Arrested

पतीच्या कमाईने खुश नव्हती पत्नी, ड्यूटीचा बहाणा करून हॉटेलमध्ये जायची, एका दिवशी अचानक पती हॉटेलमध्ये गेल्यावर तेथील दृश्य पाहून बसला धक्का

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (चंदिगड) - मोरनी एरियात एका रिसॉर्टच्या बॅक साइडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीची गळा दाबून हत्या आणि दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिस चौकशीत खळबळजनक खुलासा झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्लामचा मर्डर त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्येचा खुलासा मोबाइल कॉल, लोकेशन आणि महिलेच्या बांगड्यांवरून झाला आहे.

 

याबाबत चंडीमंदिर पोलिस ठाण्याचे प्रभारी नवीन कुमार म्हणाले की, या केसचा उलगडा करण्यात आला आहे. आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे, तर तिच्या प्रियकराला अद्याप अटक नाही. त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. पोलिस चौकशीत कळले की, इस्लामची पत्नी श्यामा प्रवीण आपल्या पतीला दररोज पीजीआयमध्ये ड्यूटीवर जाण्याचा बहाणा करायची. तिच्या पतीची तुटपुंजी कमाई होती. यामुळे ती नेहमी त्रस्त राहायची. घटनेच्या दिवशीही पत्नीने आपल्या पतीला ड्यूटीवर चालल्याचा बहाणा केला. ती घरातून निघाली आणि आपल्या प्रियकराच्या बाइकवर मोरनीच्या पलासरामधील एका हॉटेलमध्ये गेली. प्रवीणने आपल्या प्रियकरासोबत पतीचा काटा काढण्याचा कट रचला. तिनेच पतीला कॉल करून तेथे बोलावले. पती इस्लामने पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्याने दोघांत वाद सुरू झाला. पत्नीने त्याला आपल्या प्रियकराबद्दल सांगितले. यावर पतीने चिडून पत्नीला चापटा मारल्या, यात तिच्या बांगड्याही फुटल्या. हे पाहून पत्नीच्या प्रियकराने पतीचा गळा दाबला. यात पत्नीनेही त्याची साथ दिली. यानंतर दोघांनी पती इस्लामच्या चेहरा दगडांनी ठेचून काढला.


रविवारी आढळली होती पतीची डेडबॉडी
मोरनी-रायपुररानी रोडवरील पलासरा गावाजवळ रविवारी संध्याकाळी रिसॉर्टच्या मागच्या बाजूला डेडबॉडी आढळली होती. सोबतच तेथे एक बाइकही मिळाली. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा आसपासच्या लोकांनी सांगितले की, येथे भांडणे झाल्याचा आवाज येत होता. संध्याकाळी दोन बाइक या भागातील काहींनी पाहिल्याही होत्या. यानंतर येथे पती इस्लामची डेडबॉडी आढळली. करनालचा रहिवासी इस्लाम आपल्या कुटुंबासोबत नारायणगडमध्ये राहायचा. तो तेथे एका खासगी कंपनीत जॉब करत होता.


मोबाइल कॉल डिटेलवरून पोलिसांनी काढला आरोपीचा माग...
पोलिस चौकशीत खुलासा झाला आहे की, पत्नीच्या हातावर दुखापत झाली होती. जणू काही कुणीतरी बळजबरी बांगड्या फोडल्या आहेत, काही खुणाही होत्या. यानंतर तिच्या मोबाइल कॉल डिटेल आणि लोकेशनला चेक केल्यावर ती नारायणगडमध्ये नसल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांचा संशय बळावताच पत्नीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. 

 

बातम्या आणखी आहेत...