Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | panchtantra katha, motivational story, inspirational story, prerak katha, motivational katha

पंचतंत्र/ कधीच मुर्ख व्यक्तीला सल्ला देऊ नका, नाहीतर होईल तुमचेच नुकसान

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 23, 2019, 03:35 PM IST

सक्षम असूनही त्या माकडाने आपल्यासाठी एखादा आसरा न बनवता जंगलात इकडे-तिकडे फिरत होता

 • panchtantra katha, motivational story, inspirational story, prerak katha, motivational katha

  जीवन मंत्र डेस्क- पंचतंत्रांच्या गोष्टींमध्ये सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याच्या अनेक गोष्टी आहेत. पंचतंत्र पाच भागांमध्ये विभागला आहे, यात एक मित्रभेद नावाचा धडा आहे. मित्रभेद अध्यायात मित्र आणि शत्रुची ओळख कशी करावी हे सांगितले आहे. त्याच अध्यायामधील एक गोष्ट माहीत करून घ्या.

  पंचतंत्रात लिहीले आहे
  उपदेशो हि मूर्खाणां, प्रकोपाय न शान्तये।
  पयःपानं भुजडाग्नां केवल विषवर्धनम्।।

  या नितीमध्ये सांगितले आहे की, मूर्खांना दिलेला सल्ला, त्या प्रकारे त्यांच्या रागाला वाढवू शकतो, ज्या प्रकारे सापांना दुध पाजल्याने त्यांचे विष वाढते.

  आता जाणून घ्या या नितीशी निगडीत एक गोष्ट
  > एका जंगलात मोठे झाड होते. त्या झाडावर एका चिमणीचे जोडपे राहत होते. एके दिवशी जंगलात जोरदार पाऊस पडला. पाऊसापासून वाचण्यासाठी ती चिमणी आपल्या घरट्यात जाऊन बसली. थोड्यावेळानंतर त्या झाडाखाली एक माकड येऊ बसले. तो पूर्णपणे भिजलेले होते आणि थंडीने कडकडत होते.
  > सक्षम असूनही त्या माकडाने आपल्यासाठी एखादा आसरा न बनवता जंगलात इकडे-तिकडे फिरत होता. त्या माकडाला त्या अवस्थेत पाहून चिमणीने त्याला आपले एक घर बनवून त्यात राहण्याचा सल्ला दिला. तिच्या त्या सल्ल्यामुळे माकडाला अपमानित वाटले. त्याला वाटले की, चिमणीकडे स्वतःचे घर आहे आणि माझ्याकडे नाहीये आणि ती माझी मस्करी करत आहेत. नाराज झालेल्या माकडाने त्या चिमणीचे घर मोडले आणि तिलाही बेघर केले.

  कथेची शिकवन
  पंचतंत्रच्या या कथेनुसार ही शिकवण मिळते की, मुर्खांना सल्ला दिला नाही पाहीजे, असे करण्याने स्वतःचेच नुकसान होते.

Trending