आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर  - श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र, मारहाण झालेले भाविक तसेच मंदिर सुरक्षा कर्मचारी यांच्या मध्ये मंदिर समिती सदस्यांनी दिलजमाई घडवून आणल्याने या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल न होता समोपचाराने हे प्रकरण मिटले. 


या प्रकरणाची मंदिर समिती सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मथुरा सुधाकर येवलेकर (वय ७०), अविनाश सुधाकर येवलेकर, प्रियंका अविनाश येवलेकर (सर्व रा.नाशिक) तसेच  विजया सोनवणे, सनी सुनिल सोनवणे (दोघे रा. भिवंडी, मुंबई) हे सर्वजण तीन लहान मुलांसह श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज येथे आले होते. ते विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिरात गेले असता दर्शन रांगेतून लहान मुलगा दुसरीकडे गेला म्हणून त्याला पकडण्यासाठी सनी सोनवणे रांगेतून बाहेर गेला. 


या दरम्यान सुरक्षा रक्षक व सनी मध्ये वाद झाला. या वादात सुरक्षा रक्षकाने वयोवृध्द महिलेला धक्काबुकी केली असल्याचे सनी येवलेकर यांनी सांगितले. यानंतर मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, येवलेकर व सोनवणे कुटुंब आणि संबंधित सुरक्षा रक्षक येथील शहर पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी समन्वयाने हे प्रकरण मिटवण्यात आले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

बातम्या आणखी आहेत...