आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर आमच्या अखत्यारित नाही : पुरातत्त्व खाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ऐतिहासिक वास्तू आहे. त्यामुळे या मंदिरात सुधारणा करताना केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी घेतली जात होती. पण, हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे या विभागानेच स्पष्ट केल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ.अतुल भोसले यांनी सांगितले. 


या संदर्भात पुरातत्त्व विभागाने नुकतेच मंदिर समितीला तसे पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पुरातत्त्व वास्तूंची जपणूक, संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम पुरातत्त्व विभागाकडे आहे. विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वास्तूमध्ये पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय काहीच बदल करता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर मंदिरात काही आवश्यक सुधारणा करण्यासाठी समितीने पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, या विभागाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आमच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे पत्र समितीला पाठवले. 

बातम्या आणखी आहेत...