आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पं. दीनदयाल : असे होते सेवाव्रती जीवन, अपार संघटनक्षमता, रहस्यमयरीत्या झाला होता मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा 25 सप्टेंबर हा जन्मदिन आहे. - Divya Marathi
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा 25 सप्टेंबर हा जन्मदिन आहे.

25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. 50च्या दशकात सुरू झालेल्या आरएसएसच्या राजकीय संघटनेचे जनसंघाचे ते नेते होते. भाजप ज्या एकात्म मानवतावादाचे समर्थन करते, तो पंडित दीनदयाल यांचाच विचार आहे.

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राजकारणात त्यांनीच आणले. अटलजी यांनी पंडितजींचे सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते. जेव्हा त्यांना कळले की, उपाध्यायजी यांचा खून करण्यात आला आहे, तेव्हा ते ढसढसा रडले होते.

 

अशी होती ती काळरात्र...
10 फेब्रुवारी 1968 च्या रात्री सियालदाह एक्स्प्रेस लखनऊवरून पाटणाकडे जात होती. फर्स्टक्लासच्या केबिनमधून एक प्रवासी अगोदरच उतरला होता. फक्त एक प्रवासी उरला होता, त्यांना हे माहिती नव्हते की, लवकरच तेही चिरनिद्रेत लीन होणार आहेत.
- दुसऱ्या दिवशी सकाळी मुघल सराय रेल्वे स्टेशनच्या पिलर क्रमांक 1276 जवळ रेल्वे पटरीदरम्यान एक मृतदेह पडलेला होता. रेल्वेगाड्यांची आवकजावक सुरू होती, आसपास आरडाओरड सुरू होती. रुळावर पडलेल्या मृतदेहाकडे रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर गेली. त्यांनी मृतदेह उचलून स्टेशनवर आणला. मग पाहणाऱ्यांची भलीमोठी गर्दी जमली होती.
- तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका तरुणाची नजर मृतदेहावर गेली. तो किंचाळला- हे तर आमचे पंडितजी आहेत. किंचाळतच तो टेलिफोन बूथकडे पळाला आणि धापा टाकत म्हणाला- लवकर या आपल्या दीनदयालजींचा मृतदेह येथे स्टेशनवर पडला आहे. दीनदयालजी खरोखरच नाही राहिले... त्यांचा मृत्यू कसा झाला याचे रहस्य आजही उलगडलेले नाही.
-त्या आधी जनसंघाच्याच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मिरात रहस्यमयरीत्या मृत्यू झाला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी चौकशीही केली, परंतु काहीच उलगडा झाला नाही.

 

ढसढसा रडले होते अटलजी
- आरएसएस आणि जनसंघाचे मोठे नेते दीनदयाल उपाध्यायजी यांचे सचिव म्हणून त्या वेळी अटल बिहारी वाजपेयी काम पाहत होते. पंडितजींच्या निधनाचे वृत्त कळताच अटल बिहारी वाजपेयी ढसढसा रडले होते. या खुनाच्या विरोधात देशभरात निदर्शने झाली होती. अटलजी स्वत: पंडितजींच्या कुटुंबीयांसह त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी मथुरेत झाला होता. 11 फेब्रुवारी 1968 रोजी मुघल सरायमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.

 

सीबीआयनेही केला तपास
पंडितजींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी सीबीआयनेही तपास केला होता. या तपासात सीबीआयचे तत्कालीन डीआयजी जॉन लोबो म्हणाले होते की, त्यांना (पंडितजींना) रेल्वे मुघल सराय स्टेशनमध्ये प्रवेश करताना दरोडेखोरांनी ढकलले होते. परंतु, दीनदयालजींच्या जवळच्या व्यक्ती उदा. नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी यांनी कधीच हे मान्य केले नाही.
सीबीआय तपासावर आक्षेप घेत स्वामी म्हणाले होते की, पंडितजी ज्या रेल्वेने प्रवास करत होते, त्यात एकाही सहप्रवाशाची खरी ओळख, पत्ता आढळलेला नाही. सर्व पत्ते तर खोटे होतेच तसेच ओळखपत्रही. हीच तथ्ये ही केस रिओपन करण्यासाठी पुरेशी आहेत. 
- तथापि, सीबीआयने दोन जणांना अटक केली होती- राम अवध आणि भारत लाल. तपास संस्थेच्या मते, या दोघांनी जनसंघाचे नेते पंडितजींना रेल्वेबाहेर ढकलल्याचे कबूल केले. कारण पंडितजींनी त्यांना त्यांची बॅग चोरताना पकडले होते आणि पोलिसांना सांगतील या भीतीने त्यांनी असे केले. परंतु पुराव्याअभावी या दोघांची नंतर निर्दोष मुक्तता झाली होती.

 

सुब्रमण्यम स्वामींनी केली एसआयटीची मागणी
भाजप सत्तेवर आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 2015 मध्ये भाजप वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येच्या तपासासाठी एका एसआयटी स्थापण्याची मागणी केली होती.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पं. दीनदयाल यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बाबी आणि फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...