Home | Sports | From The Field | hardik pandya on koffee with karan controversy, Hardik pandya apologises,BCCI may restrict cricket players on chat show

'कॉफी विथ करण'मधील पांड्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआय क्रिकेटर्सना चॅट शोमध्ये जाण्यास करू शकते बॅन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 12:28 PM IST

पांड्याने त्याची पर्सनल लाइफ आणि महिलांबाबत अनेक वक्तव्ये केली.

 • hardik pandya on koffee with karan controversy, Hardik pandya apologises,BCCI may restrict cricket players on chat show

  स्पोर्ट्स डेस्क - करन जोहरच्या प्रसिद्ध कॉफी विथ करन या शोमध्ये हार्दिक पांड्याने केलेल्या वकत्व्यावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. सगळीकडून टीकेची झोड उडाल्यानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावरून माफी मागितली आहे. मात्र बीसीसीआयने हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेतल्याचे दिसतेय. कारण क्रिकेटर्सच्या वर्तनामुळे बोर्डाची प्रतिमा डागाळत असल्याने आता क्रिकेटपटुंना चॅट शोममध्ये जाण्यावर बंदी लावण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.


  असे होते प्रकरण..
  हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे दोघे करन जोहरच्या कॉफी विथ करन या शोमध्ये गेले होते. यावेळी शोमध्ये बोलताना हार्दिकने बिनधास्तपणे त्याच्या आयुष्याविषयीच्या प्रश्नावर उत्तरे दिली होती. उत्तरे देताना हार्दिकने अनेक वादग्रस्त, महिला विरोधी आणि वर्णद्वेषी कमेंट्स केले होते. अशी वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. तसेच त्याच्या इतरही अनेक उत्तराने त्याचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

  काय म्हणाला होता पांड्या..
  >> पांड्याने त्याची पर्सनल लाइफ आणि महिलांबाबत अनेक वक्तव्ये केली.
  >> तो म्हणाला की त्याच्या घरचे खुल्या विचारांचे आहेत. तो जेव्हा पहिल्यांचा मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवून घरी आला तेव्हा त्याने घरी येऊन, 'आज करके आया हू' असे सांगितले होते.
  >> पांड्याने सांगितले एकदा तो आई वडिलांना घेऊन पार्टीत गेला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला कोणत्या महिलेला पाहतोय असे विचारले. त्यावर पांड्याने एका पाठोपाठ सर्व महिलांकडे बोट दाखवत सगळ्यांना पाहत असल्याचे सांगितले होते.
  >> तरुणी किंवा महिलांशी बोलण्याऐवजी त्याचे लक्ष त्यांना पाहण्याकडेच अधिक असते असेही पांड्या म्हणाला.
  >> महिलांच्या चालीवर नजर असते, असेही पांड्या म्हणाला होता. तसेच तो शोमध्ये व्हर्जिनिटीबाबतही बोलला होता.

 • hardik pandya on koffee with karan controversy, Hardik pandya apologises,BCCI may restrict cricket players on chat show

Trending