आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलीस जवान तैनात, वादावर दिग्दर्शकाने दिले हे स्पष्टीकरण 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'लगान', 'जोधा-अकबर', 'मोहनजोदाडो' यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर आता त्यांच्या आगामी 'पानिपत' या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर विविध संघटनांकडून आशुतोष गोवारीकरांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. ऐतिहासिक घटनांची छेडछाड करुन चित्रपटात दाखवल्याचा आरोप या संघटनांनी गोवारीकर यांच्यावर केला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत या वादावर आशुतोष गोवारीकर म्हणाले, “जेव्हा पण आम्ही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करतो, तेव्हा चित्रपटाच्या कथेत कोणता भाग दाखवण्यात येणार आहे यावरून वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. इतिहासाच्या पुस्तकात बरीच पानं असतात, पण प्रत्येक गोष्ट चित्रपटात दाखवणं शक्य नसतं. एका ठराविक वेळेत ठराविक गोष्ट दाखवावी लागते.” 'पानिपत' हा चित्रपट 14 जानेवारी 1761 या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावर बेतला आहे. चित्रपटात संजय दत्त अहमज शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका वठवली आहे. सोबतच पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल आणि झीनत अमान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवराव या युद्धात कामी आले. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटात मांडला आहे. सिद्ध संगीतकार अजय-अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.