आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी कमाईत 'पानिपत' नव्हे 'पती पत्नी और वो' ठरला वरचढ, 'पानिपत'ने जमवला फक्त एवढा गल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा फार कमी कमाई केल्याचे दिसून आले आहे. तर कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे स्टारर 'पती पत्नी और वो' हा चित्रपट कमाईत वरचढ ठरला आहे.  ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा आकडा सांगितला आहे. त्यांनी ट्वीट केले, "पानिपतने शुक्रवारी 4.12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट जवळपास तीन तासांचा असल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम देताना थिएटर मालकांना विचार करावा लागतोय." 

  • 'पती पत्नी और वो'ची 9.10 कोटींची कमाई...

मुदस्सर अजीज दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 9.10 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट केले, "पानिपत या मोठ्या चित्रपटासोबत स्क्रिन वाटल्या गेल्यानंतरही 'पती पत्नी और वो'चा पहिला दिवस शानदार ठरला. दुस-या आणि तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसेल." आदर्श यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले, हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील आजवरचा मोठी ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. त्याने 'लुका छुपी' या आपल्याच चित्रपटाच रेकॉर्ड मोडित काढला आहे. याचवर्षी 1 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'लुका छुपी'ने पहिल्या दिवशी 8.01 कोटींची कमाई केली होती. 

  • 'पानिपत'च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता

पहिल्या दिवशी पानिपतची कमाई अपेक्षेऐवढी झाली नसली तरी समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक झाल्याने पुढील काही दिवसांत त्याच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.  या चित्रपटात अर्जुन सदाशिवराव भाऊ, क्रिती पार्वतीबाई आणि संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धावर हा चित्रपट बेतला आहे.   

बातम्या आणखी आहेत...