आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Panipat Movie Review Ashutosh Gowarikar Passed By Good Marks In This Paper Of History, Sanjay Dutt Feels Cruel In The Role Of Abdali

इतिहासाच्या या पेपरमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले आशुतोष गोवारिकर, अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त वाटला क्रूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग3/5
स्टारकास्टअर्जुन कपूर, कृती सेनन, संजय दत्त, मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, नवाब शाह, सुहासिनी मुळे
दिग्दर्शकआशुतोष गोवारिकर
निर्मातासुनीता गोवारिकर, रोहित शेलाटकर
संगीतकारअजय-अतुल
श्रेणीएपिक- वॉर ड्रामा
कालावधी2 तास 53 मिनिटे

बॉलिवूड डेस्कः ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रपट ूबनवणे सोपे काम नाही. यासाठी मोठा रिसर्च लागतो. शिवाय अशा चित्रपट बनवावा लागतो, जो आजच्या काळात प्रासंगिक वाटेल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाराही ठरेल. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर इतिहासाच्या या पेपरमध्ये चांगले गुण घेऊन पास झाले आहेत.

14 जानेवारी 1761 साली झालेल्या पानिपतच्या तिस-या लढाईचे मराठा योद्धा सदाशिवरावांनी नेतृत्व केले होते. या युद्धात सदाशिवरावांना विजय मिळाला नाही, पण त्यांनी अहमद शाह अब्दालीला सळो की पळो करुन सोडले होते. 


अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांचा अभिनय कौतुकास पात्र आहे. दोघांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना चोख न्याय दिला आहे. अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पडद्यावर क्रूर वाटला आहे. सहायक भूमिकांमधील कलाकारांनीही चोख काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारिकरांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कलाकृती सादर केली आहे. चित्रपटातील प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टीवर त्यांचे नियंत्रण दिसते.


नितिन चंद्रकांत देसाई यांचे कला दिग्दर्शन उत्तम आहे. सोबतच नीता लुल्ला यांनी त्याकाळाला साजेल असे कॉश्च्युम तयार केले आहेत. अजय-अतुल यांचे संगीत श्रवणीय झाले आहे. विशेषतः "सपना है सच है' आणि ‘मन में शिवा’ ही गाणी उत्तम जमली आहेत. युद्धातील दृश्यांत सीके मुरलीधरन यांचे कॅमेरा वर्क लक्षात राहणारे आहे.


एडिटिंगविषयी सांगायचे म्हणजे, चित्रपटाचा दुसरा भाग जलद गतीने सरकतो, पण काही भाग थोडा कंटाळवाणा वाटतो. एडिटिंगवर अजून काम करता आले असते. व्हीएफएक्स प्रभाव सोडत नाहीत. काही संवाद मराठीत आहे, जे स्पष्ट समजत नाहीत. तर कोरिओग्राफी उत्तम जमली आहे.  
 
 

बातम्या आणखी आहेत...