आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Panipat Official Trailer Release Arjun Kapoor Kriti Senan Sanjay Dutt In Lead Role

 'पानिपत'चा दमदार ट्रेलर रिलीज, संजय दत्तने मारली बाजी, मुख्य भूमिकेत अर्जुन कपूर-क्रिती सेनन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पानिपत द ग्रेट बेट्रेयल या  चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित हा चित्रपट 14 जानेवारी 1761 या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावर बेतला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांची एन्ट्री लक्ष वेधून घेते. शिवाय संवादही दमदार आहेत. चित्रपटात संजय दत्त अहमज शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका वठवली आहे. सोबतच पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल आणि झीनत अमान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.  

पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवराव या युद्धात कामी आले. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटात मांडला आहे. 

ट्रेलरपूर्वी मंगळवारी या चित्रपटातील अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनान  यांचे लूक समोर आले होते. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.