Home | News | Pankaj is shooting film '83' , even after his accident at house

अपघाताने तीन बरगड्या तुटल्यानंतरही पंकज त्रिपाठी करतो आहे चित्रपट '83'चे शूटिंग, खांद्याला आणि हाताला लागला मार   

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 22, 2019, 11:08 AM IST

अपघातानंतर सेटवर घेतली जातेय विशेष काळजी 

 • Pankaj is shooting film '83' , even after his accident at house

  एंटरटेन्मेंट डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेता पंकज त्रिपाठी व्यावसायिक शब्द पाळतो. त्याच्या तीन बरगड्या तुटूनही तो इंग्लंडमध्ये ८३ चित्रपटाचे शूटिंंग पूर्ण करत आहे. त्याच्या जवळच्या आणि चित्रपटाशी जोडलेल्या लोकांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. खरं तर, सुटीवर स्कॉटलंड आणि शूटिंगवर इंग्लंड जाण्याआधीच त्याचा मुंबईत नवीन घराच्या कॅम्पसमध्ये अपघात झाला होता. त्याच्या खांद्याला आणि हाताला मार लागला होता. तेव्हा थोडेच लागले म्हणून त्याने दुखण्याकडे दुर्लक्ष केले होते आणि औषध घेऊन तो स्कॉटलंडला रवाना झाला. त्यानंतर त्याला तेथूनच लंडनला जावे लागणार होते. ८३ ची टीम वाट पाहत होती.

  असा वाढला त्रास...
  स्कॉटलंडमध्ये सुटी घालवत असताना पंकजला पोटात आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मेडिकल चेकअपनंतर कळाले की, त्यांच्या तीन बरगड्या तुटल्या आहेत. मात्र, त्यांनी शूटिंग लटकवले नाही. ते ठरलेल्या वेळेवरच लंडनला गेले आणि तेथे शूटिंग सुरू केले.

  कशी आहे दुखापत...
  - गाडीवरून पडल्यानंतर त्याला पाेट अाणि बरगड्यांना जबर मार लागला.
  - त्यामुळे त्याच्या तीन बरगड्या तुटल्या.
  - खांद्यालादेखाील मार लागला आहे.
  - ही दुखापत त्यांना उजव्या भागाला झाली आहे.

  कसा सुरू आहे उपचार...
  - पंकजला प्लास्टर चढवण्यात आले नाही.
  - पंकजला फक्त सपोर्टिंग जॅकेट घालण्यात आले आहे.
  - लंडनचे डाॅक्टर उपचार करत आहेत.

  कसा झाला अपघाात...
  पंकजला बाइक चालवण्याची आवड आहे. तो नवीन घराच्या कॅम्पसमध्ये आवडती बुलेट बाइक चालवत हाेता. तेव्हा त्याचा ताेल गेला आणि तो उजवीकडे पडला आणि त्याला इजा झाली.

  सर्वच घेत आहेत काळजी...
  पंकजची दुखापत पाहून ८३च्या सेटवर त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. सेटवरच उपचाराची सोय करण्यात आली आहे. पंकज स्वतःही काळजी घेत आहेत.

  अपघातानंतर यांनी केले शूटिंग...
  पंकजच्या आधी इतर कलाकारांनीदेखील दुखापत असून शूटिंग केले.
  - 'गोलियों की रास लीला : राम लीला'च्या सेटवर दीपिका पदुकोणदेखील जखमी झाली होती. तरीदेखील तिने शूटिंग पूर्ण केले.
  - नुकतेच एका शूटिंगमध्ये विकी कौशलचा जबडा तुटला होता. तीव्र वेदना असूनही त्याचे शुजित सरकारच्या ऊधम सिंग बायोपिकचे शूटिंग केले.
  - शाहरुखने तर अनेकदा असे केले. 'डर'च्या सेटवर त्याच्या बरगडी आणि टाचेला मार लागला होता. 'माय नेम इज खान'च्या वेळेस त्याच्या पायाचा अंगठा तुटला होता. 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या वेळेस तर खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती.

Trending