आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम मॅनेजरच्या दृष्टिकोनातून दाखवला जाईल चित्रपट '83', पंकज त्रिपाठी साकारत आहे मान सिंह यांची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कबीर खान आपला आगामी चित्रपट '83'मध्ये अनेक प्रकारची गुपिते उघड करणार आहेत. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ८० च्या दशकात बीसीसीआय एवढी ताकदवान नव्हती. आपला संघ विश्वचषक जिंकून भारतात परत येऊ शकेल, यावरदेखील त्यांना विश्वास नव्हता. हे इनपुट्स तत्कालीन संघाचे व्यवस्थापक मान सिंह यांच्याकडून मिळाले आहेत. यात टीम इंडियाच्या विश्वचषक विजयासोबतच हे सर्वकाही दाखवले जाईल. 'गोल्ड'मध्ये संघ व्यवस्थापकाचे पात्र साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या आणि 'चक दे इंडिया'मध्ये हॉकीचा प्रशिक्षक शाहरुख खानच्या पात्राच्या दृष्टिकोनातून सर्वकाही दाखवले होते. 

 

पंकजने घेतली मान सिंह यांची भेट... 
चित्रपटात मान सिंह यांचे पात्र पंकज त्रि‍पाठी साकारणार आहे. पात्र जिवंत करण्यासाठी त्याने लंडनला जाण्यापूर्वी मान सिंह यांची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली होती. पंकजने सांगितले, 'मान सिंहजींची वैयक्तिकरीत्या भेट घेणे चमत्कारिक अनुभव होता. हैदराबादमध्ये त्यांनी घराचे संग्रहालयामध्ये रूपांतर केले आहे. मी त्यांच्या आयुष्यातील खासगी आणि व्यावसायिक मुद्द्यांवरही चर्चा केली आणि अनेक इनपुट्स गोळा केले.'