टॉक शो / कपिलच्या शोमध्ये पंकज त्रिपाठीचा खुलासा, मनोज बाजपेयी यांचे बूट त्यांचा आशीर्वाद समजून ठेवला होता स्वतःजवळ 

पंकजने हादेखील खुलासा केला की, त्याची वाइफ काही दिवस त्याच्यासोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहिली 

Sep 20,2019 03:56:40 PM IST

टीव्ही डेस्क : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी आणि कुमार विश्वास एकत्र कपिलच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसणार आहेत. कपिलच्या शोमध्ये यावेळी मनोज आणि पंकज, कुमार विश्वास यांचे आगामी पुस्तक 'फिर से मेरी याद' ला प्रमोट करण्यासाठी आले होते. शोच्या प्रोमोमध्ये या तिघांना खूप चांगले मित्र संबोधले गेले.


पंकजने परत केले नाही बूट...
कपिल शर्मासोबत बोलताना मनोज बाजपेयी यांनी या गोष्टीचा खुलासा केला की, पंकजने त्यांचे बूट हॉटेलमधून नेले होते आणि ते परातदेखील केले नाहीत. मनोज वाजपेयी म्हणाले, “जेव्हा आम्ही गँग्स ऑफ वासेपुरचे शूटिंग करत होतो तेव्हा पंकज माझ्या जवळ आला त्याने कबूल केले की, जेव्हा मी पटनाला गेलो होतो एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेव्हा त्याने जाणूनबुजून माझे बूट परत केले नव्हते."


आठवण म्हणून ठेवले होते स्वतःजवळ...
पंकज त्रिपाठीने याबद्दल पुढे सांगितले की, “त्यावेळी मी पटनाच्या एका हॉटेलमध्ये सुपरवायजर होतो. मला कळाले की, मनोज आमच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेव्हा मी खूप उत्साहित झालो होतो. मी सर्वांना म्हणालो की, त्यांच्या रूमधून जी काही ऑर्डर येईल ती केवळ मीच घेऊन जाणार. मी मनोज बाजपेयीचा खूप मोठा फॅन राहिलो आहे. मनोजने सूप आणि सफरचंदाची आर्डर दिली. मी त्याच्यासाठी 50-60 सफरचंदाच्या गुच्छातून 4 चांगले सफरचंद निवडले आणि त्याला पर्सनली जाऊन नेऊन दिले. जेव्हा रतो हॉटेलच्या रूममधून बाहेर निघाला तेव्हा मला कुणीतरी सांगितले की, मनोज आपले बूट रुमध्येच सोडून गेला आहे. मी म्हणालो की, याला लॉस्ट अँड फाउंडमध्ये परत करून नका. मी ते आशीर्वाद आणि अविस्मरणीय क्षण म्हणून जवळ ठेवेन."


वाइफ राहिली बॉईज हॉस्टेलमध्ये...
बोलता बोलता पंकज त्रिपाठीने याचाही खुलासा केला की, त्यांची पत्नी मृदुला त्यांच्यासोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहात होती. पंकज म्हणाला, “लग्न केले होते, काय करणार होतो. माझ्याकडे तिला हॉस्टेलमध्ये ठेवण्याव्यतिरिक्त काहीच ऑप्शन नव्हता. हॉस्टेलमध्ये सर्वांनी पूर्ण कपडे घालायला सुरुवात केली होती आणि शिस्तीत राहायचे. पण जेव्हा हॉस्टेल वार्डनला याबद्दल कळाले तेव्हा आम्हाला घर शोधावे लागले."

X